Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे, आ. दीपक केसरकर नतमस्तक

किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे, आ. दीपक केसरकर नतमस्तक

छत्रपती शिवाजी महाराज की जय… घोषणानी परिसर दणाणला : शिवजयंती सोहळा मालवणात उत्साहात साजरा

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्त आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाले. महाराजांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय… यां जयघोषाने परिसर दणाणून गेला.

दरवर्षी शिवजयंती सोहळा निमित्ताने आमदार निलेश राणे किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतात नतमस्तक होतात त्यानुसार त्यांनी दर्शन घेतले. महाराज हे आम्हा सर्वांचे दैवत आहे. यां दैवताची पुजा केली आशीर्वाद घेतले. असे आ. निलेश राणे यांनी सांगितले.

शिवजयंती दिनी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली असे ट्वीट केले आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता आमदार निलेश राणे म्हणाले, राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना देशाची संस्कृतीच माहित नाही. गांधी आणि ठाकरे यां दोंघांमध्ये घमेंड अधिक आहे. राहुल गांधी यांनी माफी मागितलीच पाहिजे. असेही आ. निलेश राणे म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, संजू परब, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, दादा साईल, राकेश सावंत, राजेश सावंत, राजू बिडये, निषय पालेकर, सनी कुडाळकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, दीपालक्ष्मी पडते, माधुरी तुळसकर, आशा वळपी, सिद्धी शिरसाठ, सोनाली पाटकर, अंजना सामंत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, ऋषिकेश सामंत, विराज गुडेकर यांसह अन्य पदाधिकारी शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

rapan bottom