अजय शिंदे यांची कार्याध्यक्ष पदी फेर निवड…
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय कार्यकारिणीची निवड, महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूरच्या न्यू कॉलेज सभागृहात एकमताने करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांची कोल्हापूर विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्षपदी पुन्हा फेर निवड करण्यात आली, त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल हायस्कूल चे क्रीडा शिक्षक श्री मारुती माने, यांची उपाध्यक्ष पदी ,विभागीय संघटक म्हणून श्री अजय सावंत सोनवल हायस्कूल दोडामार्ग , तर निमंत्रित कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री सुदीन पेडणेकर, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली व श्री संतोष तावडे सौ इ. द.वर्दम हायस्कूल पोईप मालवण यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी साताऱ्याचे श्री आर वाय जाधव तर सचिवपदी सांगलीचे श्री सचिन आरोळे यांची एकमताने निवड करण्यात आली…
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..
अध्यक्ष -आरवाय जाधव (सातारा)
कार्याध्यक्ष -अजय शिंदे (सिंधुदुर्ग)
उपाध्यक्ष- मारुती माने(सिंधुदुर्ग)
महेंद्र भोसले (सातारा)
महेश सूर्यवंशी( कोल्हापूर) संजीव मोरे (रत्नागिरी)
जितेंद्र पाटील (सांगली) कोषाध्यक्ष -संदीप पाथरे (कोल्हापूर)
सचिव -सचिन हरवले (सांगली)
सहसचिव- राजेंद्र माने( सातारा)
संघटक -उदयराज कळंबे (रत्नागिरी)
सयाजीराव पाटील (कोल्हापूर)
यशवंत गायकवाड( सातारा)
सुधाकर माने (सांगली)
अजय सावंत (सिंधुदुर्ग)
राज्य प्रतिनिधी -आर डी पाटील (कोल्हापूर)
मनोहर यादव (सातारा)
महिला आघाडी-
सौ साक्षी नलावडे (रत्नागिरी)
सौ अलका पाटील (कोल्हापूर)
सौ योगिता परमने (सांगली)
सौ उमा भेंडीगिरी (कोल्हापूर)
,कार्यालयीन सचिव -युवराज माने (रत्नागिरी)
निमंत्रित कार्यकारणी सदस्य
श्री सुदीन पेडणेकर (सिंधुदुर्ग)
संतोष तावडे (सिंधुदुर्ग)
राजेंद्र बुवा (कोल्हापूर)
आर्यन पाटील (कोल्हापूर)
संतोष देशमुख (सातारा)
अमोल सूर्यवंशी (सांगली)
निलेश बागडी (रत्नागिरी) अमित शिंत्रे (कोल्हापूर) शहाजी खरमटे (सांगली) संजय मोरे (कोल्हापूर)


महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष श्री शरदचंद्र धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यकारिणी निवड करण्यात आली या कार्यकारिणीच्या सभेला विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते..
निवडणूक निरीक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरचे सचिव राजेंद्र पितळी ,कोल्हापूर जिल्हा व्यासपीठाचे सभाध्यक्ष श्री एस डी लाड ,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. डी एस घुगरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री एस व्ही सुर्यवंशी ,महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आर डी पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी सर्वांना मार्गदर्शन केले.


महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूरच्या न्यू कॉलेज सभागृहात झालेल्या या सभेत क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाच्या सद्यस्थिती व भविष्यात करावयाच्या कार्याबाबत शरदचंद्र धारूरकर राज्याध्यक्ष यांनी महासंघाची भूमिका मांडली. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री कळंबे व नवीन निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱी व सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे पाच पदाधिकारी यावर्षी प्रथमच कार्यकारणी मध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याबद्दल, राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष श्री विजय मागाडे, सचिव नंदकिशोर नाईक, उपाध्यक्ष जयराम वांयगणकर, उपाध्यक्ष विजय मयेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

