Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल

सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार 'पालकमंत्री कक्ष

'सिंधुदुर्ग : सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच 'पालकमंत्री कक्ष' सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री स्वतः जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी उपस्थित असणार आहेत.जिल्हा प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्य जनतेचे अनेक विषय असतात. अनेकदा त्यांना प्रशासकीय पातळीवर खेपा माराव्या लागतात. काहीवेळा विषय मार्गी लागण्यास अडचणीही येतात. अशावेळी सर्वसामान्यांना आपले विषय मार्गी लावण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच पालकमंत्री कक्ष स्थापन होणार आहे. यासाठीची जागाही निश्चित करण्यात आली आहे. तसेच जनता दरबाराच्या अनुषंगाने पालकमंत्री जनतेची थेट भेट घेत त्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावणार आहेत. सामान्य जनतेला प्रशासकीय पातळीवर कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी ही पावले उचलली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे.

rapan bottom