Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी घेतले आंगणेवाडीला भेट

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी घेतले आंगणेवाडीला भेट

आंगणे ग्रामस्थ मंडळ व प्रशासना सोबत विविध विभागाकडून यात्रा नियोजन व तयारीचा घेतला आढावा बैठक.

संजय माने | पोईप : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा चार दिवसांवर येऊन ठेपली असून आंगणे ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात युद्ध पातळीवर सुरु असून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज आंगणेवाडी येथे बैठक घेऊन विविध विभागाकडून यात्रा नियोजन व तयारीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील याच्यासमवेत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले, विनय काळे, डीवायएसपी घनश्याम आढाव, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सतीश आंगणे, सचिव काका आंगणे, बाबू आंगणे, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांच्यासह एसटी विभाग, नगरपालिका विभाग, बीएसएनएल, पाणी पुरवठा आदी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यात्रेत थाटलेल्या दुकानांमध्ये वीज पुरवठा करताना वीज वितरण विभागाने वायरिंग बाबत काळजी घ्यावी. यात्रेत वीज चोरी करून व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर वीज विभागाने विभागाने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. आंगणेवाडीकडे येणाऱ्या रस्त्यांची साईडपट्टी सुधारून घ्यावी, या रस्त्यांच्या लगत वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडी व फ़ांद्या तोडून घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिल्या. पाणी पुरवठा विभागाने यात्रेत पुरवठा करण्यात येणाऱ्या जलस्रोतातील पाण्याची पुन्हा एकदा तपासणी करावी, बीएसएनएल व जिओ कंपनीने आंगणेवाडीत मोबाईल नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने यात्रेत विविध ठिकाणी प्रथमोपचार किट घेऊन असलेले वैद्यकीय कर्मचारी तैनात ठेवावे, असेही जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

यात्रेत व्यापाऱ्यांनी रस्त्यावर आपला माल मांडू नये, तसेच यात्रेतील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये वाढ करावी असे पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले यांनी सांगितले. यात्रेतील कणकवली बस स्थानक ठिकाणी बस व खासगी पार्किंग अशी वेगवेगळी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. यात्रेत रात्री प्रसादाच्या कार्यक्रमांनंतर मोठी गर्दी उसळत असल्याने त्यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, अशी सूचना आंगणे मंडळींकडून करण्यात आली.

rapan bottom