Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शासकीय योजनांचा लाभ घ्या - पंढरी चव्हाण

शासकीय योजनांचा लाभ घ्या - पंढरी चव्हाण

पणदूर मध्ये बांधकाम कामगार मेळावा संपन्न

कामगारांच्या 800 मुलांचा गुणगौरव

निलेश जोशी| कुडाळ : शासन दरबारी बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत या सर्वांचा अभ्यास बांधकाम कामगारांनी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यात केले. यावेळी बांधकाम कामगारांच्या सुमारे 800 हून अधिक मुलांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु देऊन करण्यात आला.    श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्र च्या वतीने कामगार यांच्या मुलांचा सन्मान सोहळा व कामगार मार्गदर्शन स्नेहमेळाव्याचे आयोजन पणदूर हायस्कूल गंगाबाई दळवी सभागृह या ठिकाणी करण्यात आले होते स्नेहमेळाव्याचे उद्घाटन पंढरी चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर भारतीय चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष सी आर चव्हाण अरुण होडावडेकर श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण उद्योजक बाबल पावसकर रामदास तेंडोलकर सौ सरिता राऊत पूजा बागकर अनघा रांगणेकर संदीप चव्हाण नारायण येरम अंतरा गावडे विजय बागकर विश्वनाथ चव्हाण राजू साटेलकर भैरू पाटील राजेश चव्हाण गुंडू जाधव संजना पाटकर रोहिदास नार्वेकर संतोष बांदेकर संतोष देऊलकर अरविंद शिरोडकर दिनेश गोसावी चंद्रशेखर देवळी कृष्णा गावडे कृष्णा राऊत रवींद्र जाधव गुरुनाथ कांदे निलेश पांगम रोहीणी चव्हाण भूषण पाताडे संदेश किनावडेकर रणजीत राणे मारुती पवार रसिका कदम बाळकृष्ण धरणे भद्रायू परुळेकर नामदेव जानकर जिल्ह्यातील श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे पदाधिकारी कामगार वर्ग  त्यांची मुले आदि मोठ्या संख्येने उपस्थित होती.

यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी बांधकाम कामगार व त्यांच्या मुलांसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आतापर्यंत शालेय पातळीवर एक ते तीन क्रमांकाच्या गुणावताचा गौरव झाला मात्र बांधकाम कामगारांच्या आठशेहून अधिक संख्येने असणाऱ्या गुणवंत मुलांचा गौरव होणारा हा पहिलाच कार्यक्रम असेल यासाठी श्रमिक कामगार कल्याणकारी संघाची सर्व टीम या कौतुकास पात्र आहे बांधकाम कामगार हा विविध घटकात मोडत असतो शासनाच्या विविध योजना असून त्या योजनांचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे सर्वप्रथम बांधकाम कामगार हा एका छत्राखाली येऊन अन्यायाच्या विरोधात सुद्धा आवाज उठवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले   शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी श्रमिक कामगार कल्याणकारी संघाने या निमित्ताने विद्यार्थी व पालक यांना एकत्र आणून जो सन्मान सोहळा केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे बांधकाम कामगारांच्या मुलांचा गौरव हा सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे शासनाच्या विविध योजना आहेत सरकार जसे बदलते तशा योजना बदलतात आता ज्या योजना कार्यरत आहेत त्या योजनांचा प्रत्येकाने लाभ घेऊन वाटचाल केली पाहिजे  बांधकाम कामगारांच्या मुलानी भविष्याचे वेध घेताना मोठमोठ्या पदावर वाटचाल करताना जिल्हाधिकारी विविध पदाचे अधिकारी यासाठी सुद्धा पावले टाकली तर ती सिंधुदुर्गासाठी निश्चितच भूषणावह ठरेल असे सांगितले श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास तेंडोलकर यांनी बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळेल? यासाठी इमारत बांधकाम क्षेत्रातील कामगार आता जागा झाला पाहिजे मात्र ज्या अनेक अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील यासाठी श्रमिक कामगार कल्याणकारी संघ आपल्यासाठी निश्चितच काम करणार आहे  यासाठी तुम्ही एकत्र या असे आवाहन त्यांनी केले श्रमिक कामगार कल्याणकर संघाचे राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या 21 योजना सह बांधकाम कामगारांचे आरोग्यसुद्धा महत्त्वाचे आहे या संघाच्या माध्यमातून लवकरच गावागावात आरोग्य तपासणी शिबिर घेऊन शासनाच्या आरोग्य विषयीच्या योजना आहेत त्याचा लाभ आपल्या बांधकामकारांना सर्वाधिक कसा मिळेल या दृष्टीने मी सर्वांच्या सहकार्याने मी कार्यरत राहणार असण्याचे सांगितले किरण कुबल यांनी जिल्ह्यात पंचवीस हजार  बांधकाम कामगार कार्यरत असून त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा याबाबत मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गोसावी आणि भारतीय चर्मकार समाज चे पदाधिकारी भारत पेंडूरकर यांनी केले.

rapan bottom