Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आंगणेवाडी लागली सजू

आंगणेवाडी लागली सजू


यात्रेची जय्यत तयारी सुरु...

संजय माने | पोईप : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री.देवी भराडीच्या यात्रोत्सवाला २२ फेब्रुवारी पासून सुरुवात होत असून यात्रेची अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रा सात दिवसावर येऊन ठेपली असून सात दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवात येणाऱ्या लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटूंबिय व आंगणे ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत. यावर्षी यात्रेस येणाऱ्या दिवांग्य भाविकांसाठी मालवण ते कणकवली दिशेने असलेल्या रिक्षात बसून मंदिरात दर्शनासाठी आणण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. अशी माहिती आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यानी दिली आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात्रेसाठी युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. २२ रोजी पहाटे ३ वाजल्यापासून विविध रांगांद्वारे भाविकांना भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. यात्रोत्सवात सिंधुदुर्ग जिल्हा बरोबरच राज्यातील लहान मोठे व्यापारी आपआपली दुकाने थाटतात. यासाठी महिनाभर अगोदर दुकानांच्या जागा निवडण्यात येतात. गेले आठ दहा दिवस व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर लाईट व्यवस्था. सर्वत्र विद्युत रोषणाई. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याकडे ही लक्ष दिले जात आहे.

यावर्षीही यात्रेला भाविकांचा जनसागर उसळेल असा अंदाज व्यक्त होत असून यावर्षी भाविकांच्या सुरक्षेला तसेच सुलभ होण्यास प्राधान्य देताना त्रृटी दूर केल्ला जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षीही दिव्यांग बांधवांना भराडी मातेचे दर्शन घेण्यासाठी आंगणे ग्रामस्थ मंडळाने विशेष सोय केली असून आंगणेवाडीत मालवण व कणकवलीच्या बाजूने असलेल्या वाहणतळाच्या ठिकाणी दिव्यांग भाविकांना मंदिरापर्यंत नेण्यासाठी रिक्षा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे त्यांना सुलभ दर्शन होईल, अशी माहीती छोटू आंगणे यानी दिली.

मंदिर परिसरात यात्रोत्सवाची तयारी युध्दपातळीवर सुरू असून आंगणे कुटूंबिय,आंगणेवाडी विकास मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी तसेच दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत असा दोन दिवस साजरा होणार आहे. दुसऱ्या दिवशीही आंगणेवाडीत येणाऱ्या सर्वांना देवीचे सुलभतेने घेता येणार आहे.

rapan bottom