Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

शिवाजीनगरचे 'छ.शिवाजी महाराज नगर' नामांतर

शिवाजीनगरचे 'छ.शिवाजी महाराज नगर' नामांतर

शिवप्रेमींनी मानले नगराध्यक्षांचे आभार

तीन वर्षापूर्वीपासूनची होती मागणी

निलेश जोशी | कुडाळ :कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर शहरातील शिवप्रेमींनी शिवाजी नगर ला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करण्याची मागणी केली होती मात्र तीन वर्षात ही मागणी पूर्णत्वास गेली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर महायुतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर शिवाजीनगरला करण्यात आले. याबद्दल महायुतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर यांच्यासह नगरसेवकांचे शिवप्रेंमीनी आभार मानले.


कुडाळ शहरातील शिवप्रेमींनी तीन वर्षांपूर्वी शहरातील शिवाजी नगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करावे अशी मागणी केली होती. मात्र शिवप्रेमींचे हे पत्र सभागृहासमोर आणले गेले नाही. दरम्यान विवेक पंडित व रमा नाईक यांनीही बाब महायुतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतरची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या विषय पटलावर गटनेता विलास कुडाळकर यांनी शिवप्रेमी व आमची मागणी आहे की, शिवाजी नगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करावे हा विषय ठेवला होता. या विषयाच्या अनुषंगाने महायुतीच्या सात नगरसेवकांनी त्याला संमती देऊन शिवाजी नगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतरित केले. हा ठराव झाल्याचे शिवप्रेमी यांना समजल्यावर त्यांनी आज (शनिवारी) नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची भेट घेतली आणि यावेळी उपस्थित असलेले गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच महायुतीच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानले.
यावेळी विवेक पंडित, भावना केळकर, प्रख्यात काणेकर, अमोल निकम, उदय आईर, पांचाळ (बंधू), श्रीकृष्ण शिरोडकर, अभिषेक रेगे, विघ्नेश दाभोलकर, जगदीश भोसले, रूपेश मोरे, विकास पटवर्धन आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.

rapan bottom