Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करून आरोप करावेत

काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करून आरोप करावेत

माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी सुनावले

महाविकास आघाडीत असतानाची खदखद पडली बाहेर

निलेश जोशी | कुडाळ : काँग्रेस पक्षातून आम्ही स्वतःहून बाहेर पडलो. त्यामुळे आमची हकालपट्टी झाल्याचे  जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख कसे  काय म्हणू शकतात, असा सवाल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुडाळच्या माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे इर्शाद शेख भाजपच्या नगरसेविकेला सहकार्य करायला सांगतात आणि दुसरीकडे आम्ही पैशाला बळी पडल्याचं बोलतात. त्यामुळे इर्शाद शेख यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं आणि नंतर आमच्या वर आरोप करावेत असं आफरीन करोल यांनी सांगितलं. यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर उपस्थित होत्या.
    माजी नगराध्यक्ष आफरीन करोल म्हणाल्या, आपल्याला व अक्षता खटावकर या आम्हा दोघांना नगराध्यक्षपदाचा जो बहुमान मिळाला तो, काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मुळेच मिळाला आहे. त्यांचे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्यावर आमचा कोणताही रोष नाही. मात्र स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आम्ही आमिषांना बळी न पडता महाविकास आघाडीलाच मतदान केले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आम्हाला कोणीही सहानुभूतीपूर्वक आधार दिला नाही. महाविकास आघाडीतील एक नगरसेविका फुटून सत्ता पालट होणार याची चर्चा सुरू असतानाही काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी कोणताही सिरियसपणा घेतला नाही. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो तेव्हा महाविकास आघाडीचा एकही नेता किवा पदाधिकारी तेथे उपस्थित नव्हता. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या सर्वानीच आम्हाला वा-यावर सोडले. म्हणूनच आम्ही शहर विकासासाठी भाजपात गेलो आहोत. माझी व अक्षता खटावकर यांची काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी हकालपट्टी केलेली नसून, आम्ही स्वतःहूनच अगोदरच भाजपात गेलो आहोत. त्यांनी हकालपट्टी केल्याचा फक्त स्टंट  केला आहे. काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्याशी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा करताना ते आम्हाला म्हणाले की, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष बसवायचा आहे. त्यांचं ते बघून घेतील. आपण फक्त त्यांना साथ द्यायची आहे, ते ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतील त्या मतदाराला उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना साथ दिलीच तशीही आताही त्यांना साथ दिली. मग आम्ही कोणता गुन्हा केला का?. आमच्यावर आरोप करणा-यांनी ठाकरे सेनेचे पाच आणि काँग्रेसचे दोन असे एकूण सात नगरसेवक का फुटले? याचे आत्मपरीक्षण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावे, असे आव्हान आफरीन करोल यांनी दिले आहे.

rapan bottom