Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

भाजपची 'ती' कृती निषेधार्ह : मंदार शिरसाट

भाजपची 'ती' कृती निषेधार्ह : मंदार शिरसाट

माझ्यासाठी विषय संपला; आता लक्ष्य कुडाळच्या विकासाकडे

निलेश जोशी | कुडाळ : महाविकास आघाडीच्या कुडाळमधील लोकनियुक्त नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेण्याची भाजपाची कृती निषेधार्ह आहे. पण माझ्यासाठी तो विषय कालच संपला आहे. टीकाटिपणी करण्यात आणि आरोप प्रत्यरोपात मला काडीचाही रस नाही. शहराच्या विकासासाठी मी अखेरपर्यंत झटत राहणार आहे. असे युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. शिरसाट म्हणतात, गेल्या दहा वर्षांपासून मी राजकारण आणि समाजकारणात आहे. मी कधीच कोणत्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर पातळी सोडून टीका केली नाही. धोरणत्मक विरोध केला आणि जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने केली. रचनात्मक राजकारण हेच माझे ध्येय आहे.


युवासेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना संघटना बांधणीबरोबरच तरुणांच्या हाताला काम देण्याचा मी प्रयत्न केला. नगरसेवक म्हणून अभिनव नगर परिसरात मी केलेली जनहिताची कामे नागरिकांच्या समोर आहेत. कामाचा हा झपाटा यापुढेही असाच कायम ठेवणार आहे.


शहराच्या राजकारणात कितीही बदल झालेला असला तरी माझी भूमिका कधीच बदलणार नाही. आरोग्य सभापती म्हणून आणखी एक वर्ष मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बदलू शकत नाहीत. या पदाच्या माध्यमातून शहरवासियांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हाती घेतलेली जागृती मोहीम पुढे चालू राहणार आहे. गप्पी मासे ठिकठिकाणी सोडले जाणार आहेत. भांगसाळ नदीतील गाळ काढण्यासाठी शासन दरबारीं पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच पर्यटनमध्ये मंजूर असलेला भंगसाल नदी येथील गणेश घाट देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे श्री. शिरसाट म्हणतात.


मंदार शिरसाट म्हणतात, मी ठाकरेशी एकनिष्ठ आहे. चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारा मी कार्यकर्ता नाही. शिवसेना म्हणजे ठाकरे ही माझी श्रद्धा आहे. पैसे कमावण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. आज नगरसेवक भाजपात गेलेले असले तरी शहरातील सामान्य मतदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत सोबत असलेल्या शिवसैनिकांना घेऊन इर्षेने लढा दिला जाणार आहे. उद्धवसाहेब, आदित्य साहेब यांच्यावर विश्वास ठेऊन शहरवासीय पुन्हा ठाकरेच्या शिवसेनेची सत्ता आणतील हा माझा विश्वास आहे, असे मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

rapan bottom