Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

तेंडोलीत उद्यापासून तेंडोली महोत्सवाचे आयोजन

तेंडोलीत उद्यापासून तेंडोली महोत्सवाचे आयोजन

तीन दिवसांच्या महोत्सवात विविध कार्यक्रम

१६ फेब्रुवारीला महोत्सवाची सांगता

निलेश जोशी | कुडाळ :तालुक्यातील तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर येथे 14 ते 16 फेब्रुवारी याकालावधीत प्रथमच 'तेंडोली महोत्सव 2025' आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे.


सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत गावातील महिलांना व लहान मुलांना खुले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांचा या महोत्सवात महत्वाचा सहभाग असणार आहे. महोत्सव कालावधीत होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत - १४ रोजी सायंकाळी ४ वाजता शोभा यात्रा, ६ वाजता महोत्सवाचा उद्घाटन सोहळा, ७ वाजता रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन, ७.३० वाजता वेशभूषा स्पर्धा- लहान गट - वय ५ ते १२ वर्षे व मोठा गट - १२ वर्षावरील, रात्री १० वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे ट्रीकसीनयुक्त 'आयोध्याधिश श्रीराम' नाटक, १५ रोजी सकाळी ९ वाजता आरोग्य शिबीर, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, ६ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा-लहान गट - वय ५ ते १२ वर्षे, मोठा गट - वय १२ वर्षावरील
१६ रोजी सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा (चौथी ते दहावी) सायंकाळी ६ वाजता तेंडोली गावातील नवोदित कलाकारांचा सुरमयी शाम- कराओके शो, 7 वाजता पारितोषिक वितरण व ऋणनिर्देशन, रात्री 9 वाजता साई जळवी फिल्म्स आणि सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आर्केस्टा जल्लोष मनोरंजनाचा महाराष्ट्र आणि गोवा मधील सुप्रसिद्ध लोकप्रिय गायक, वादक, कलाकारांसोबत अफलातून नृत्यांगनांचा कलाविष्कार होणार आहे.कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.

rapan bottom