Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

भारतीय संघच चॅम्पियन ट्रॉफीचा प्रमुख दावेदार!

भारतीय संघच चॅम्पियन ट्रॉफीचा प्रमुख दावेदार!

सूर्यकुमार यादव यांचे प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांनी आचरा दौऱ्यात व्यक्त केला विश्वास

सिद्धेश आचरेकर | स्काय न्यूज टुडे : भारतीय क्रिकेट संघाच्या आघाडीच्या फलंदाजांचा सुरू असलेला बॅडपॅच आयसीसीच्या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी निश्चित संपुष्टात येईल. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आपल्या लयीत आला आहे. तर महान फलंदाज विराट कोहलीसुद्धा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजानी महत्वपूर्ण योगदान दिल्यास चॅम्पियन ट्रॉफीवर आपलाच हक्क असेल, असा आशावाद टी २० कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांनी आचरा येथे व्यक्त केला.

मिस्टर ३६० अर्थात सूर्यकुमार यादव यांचे प्रशिक्षक अशोक आस्वलकर हे आपल्या कौटुंबिक कामानिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. आचरा येथे आल्यावर त्यांच्याशी आगामी चॅम्पियन ट्रॉफीबाबत संवाद साधला असता त्यांनी मुक्तसंवाद साधला. भारतीय क्रिकेट संघाची मागील काही महिन्यात टॉप ऑर्डर आऊट ऑफ फॉर्म होती. मात्र चॅम्पियन ट्रॉफीचा दुष्काळ संपविण्यासाठी रोहित शर्मा कर्णधार म्हणून गेम प्लान घेऊन मैदानात उतरेल. रोहित हा त्याच्या लयीत येत आहे. शिवाय विराट कोहलीचे जोरदार पुनरागम होणे ही भारतीय संघासाठी जमेची बाजू असेल. चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरायचे असल्यास स्पर्धेतील सर्व सामन्यात आघाडीच्या चार फलंदाजांच्या कामगिरीवर सारे अवलंबून असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहाची नक्कीच उणीव भासेल. मात्र फलंदाजी आपली चोख भूमिका बजावल्यास मोहम्मद शमीच्या साथीने अर्शदिप सिंह, हर्षित राणा, हार्दिक पांड्या यांचे काम सोपे होईल, असे त्यांनी सांगितले.

मधली फळी मजबूत स्थितीत

भारतीय संघाची मधली फळी मजबूत आहे. श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, रिषभ पंत हेदेखील चांगल्या लयीत असून सातत्यपूर्ण खेळी त्यांनी साकारल्या आहेत. शुभमन गिल मोलाची भूमिका निभावत आहे. रोहित, विराट यांच्या पुनरागमासाठी त्यांना एक मोठी खेळी पुरेशी आहे. रोहितने नैसर्गिक खेळ केल्यास त्याच्या बॅटमधून मोठ्या खेळी दिसतील. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत या दोन दिग्गजांचे योगदान टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल, असेही आस्वलकर म्हणाले.

सूर्या लवकरच कमबॅक करेल!

खेळ म्हटल्यावर चढ उतार आलेच. टी २० चे कर्णधार पद त्याच्याकडे आहे. मात्र एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. सूर्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. लवकरच तो एकदिवसीय क्रिकेट संघात आपले स्थान निश्चित करून आपल्या अफलातून शैलीचे दर्शन घडवेल. सूर्या किंवा अन्य क्रिकेटपटूंना कोणी टार्गेट न करता त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे, असे अशोक आस्वलकर यांनी स्काय न्यूज टुडेशी बोलताना सांगितले.

rapan bottom