प्रतिनिधी | कुडाळ : पिंगुळी येथे मोटार सायकल आणि आयशर टेम्पो मध्ये भीषण अपघात अपघातातील नेरूर येथील १९ वर्षे युवकाचे झाले निधन
मोटरसायकलवर अजूनही दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कुडाळ - वेंगुला मुख्य रस्त्यावर पिंगुळी रेल्वे ब्रिज नजीक आयशर टेम्पो ज्युपिटर दुचाकिची समोर समोर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात नेरूर पंचशीलनगर येथील दुचाकीस्वार हरेश संतोष नेरुरकर (19) हा युवक जागीच ठार झाला. दुचाकी वरील प्रथमेश प्रकाश नेरुरकर (27) राहणार नेरूर पंचशीलनगर सध्या रा (नालासोपारा मुंबई ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता सुमारास घडली आज दुपारी जुपिटर दुचाकी वरून हरेश नेरुरकर, प्रथमेश नेरूरकर, व सुमित जाधव ती कुडाळहून पिंगुळी म्हापसेकर तिठ्याच्या दिशेने जात होते. पिंगुळी रेल्वे ब्रिज नजीक सदर दुचाकीची समोर येणार आयशर टेम्पोला जोरदार धडक बसली यात दुचाकीस्वार हरेश नेरुरकर याला गंभीर दुखापत होऊन तो जागी ठार झाला. तर प्रथमेश व सुमित गंभीर जखमी झाले. त्या दोघांना 108 रुग्णवाहिकेतून तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून प्रथमेशला बांबुळी गोवा येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. तर सुमित याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार साठी करण्यात हलवण्यात आले. धडक एवढी जबरदस्त होते की. जुपिटरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. कुडाळ येथील पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेने नेरुर येथील पंचकोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंगुळी येथील अपघातात नेरूर येथील युवक जागीच ठार
