Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वायंगणी श्री देव रवळनाथाची डाळपस्वारी १९ फेब्रुवारीपासून

वायंगणी श्री देव रवळनाथाची डाळपस्वारी १९ फेब्रुवारीपासून

स्काय न्यूज टुडे
आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ डाळपस्वारी सोहळा १९ ते २३ फेब्रुवारी या कालावधी होणार आहे.

बुधवार १९ फेब्रुवारी रोजी डाळपस्वारी रवळनाथ मंदिर येथून दुपारी निघणार आहे. श्री देव गांगेश्र्वर, श्री देव रामेश्वर भेट घेऊन देव मळाशेतीतून, श्री देव ठाणेश्वर, श्री राजेश्वर, विठलादेवी भेट घेऊन भंडारवाडी दर्शन, ग्रामस्थांना आशीर्वाद देऊन सायंकाळी श्री देव ठाणेश्वर मंदिर येथे विसवणार आहेत.

गुरुवार २० फेब्रुवारी रोजी डाळपस्वारी दुपारी श्री ठाणेश्वर मंदिर मधून भटवाडी तेथे भाविकांना दर्शन देऊन श्री जामदार खाना येथे भेट व पाटवाडी येथे भाविकांना दर्शन देऊन सायंकाळी श्री ब्राम्हणदेव बांध (तळेवाडी) येथे विसावणार आहेत.

शुक्रवार २१ रोजी दुपारी श्री ब्राम्हणदेव बांध तळेवाडी येथून डाळपस्वारी निघून तळेवाडी पश्चिम दर्शन, श्री देवी कुलस्वामिनी भेट, पूर्व तळेवाडी दर्शन, श्री भैरवनाथ भेट, नळेकरवाडी येथे भाविकांना दर्शन भेट देऊन, सायंकाळी श्री ब्राम्हणदेव मंदिर (गडगेवाडी) येथे विसवणार आहेत. शनिवार २२ रोजी दुपारी श्री ब्राम्हणदेव, गडगेवाडी येथून डाळपस्वारी, गडगेवाडी, कालावल, खांबलवाडी व सडयेवाडी दर्शन होऊन सायंकाळी (सडयेवाडी) येथे विसवणार आहेत.

२३ रोजी सडयेवाडी येथून डाळपस्वारी, श्री भिकन्नाथ भेट, कामत बाग दर्शन, श्री राजेश्वर भेट, मळेवाडी, दुखंडेवाडी, घाडीवाडी, श्री गांगेश्र्वर, रामेश्वर भेट, देऊळवाडी दर्शन होऊन श्री सातेरी देवी भेट, घेऊन सायंकाळी श्री रवळनाथ मंदिर ( मांड ) येथे डाळपस्वारी पूर्ण होणार आहे. भाविकांनी, डाळपस्वारी सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित राहून या दैविक सुवर्ण संधीचा लाभ घेत दर्शन, श्रींचा आशीर्वाद, प्रसाद घेऊन आनंद लुटावा, असे आवाहन श्री रवळनाथ गावरहाटी देवालय समिती वायंगणी, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.

rapan bottom