Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी करा !

माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी करा !

मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी

चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार : किनळेकर


निलेश जोशी | कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांची गेल्या तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे आवश्यक असल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांना चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार ? असा सवाल देखील श्री. किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.


कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या जमान्यात गेले तीन वर्ष सुरू असलेली चौकशी नेमकी कधी संपणार, कधी कारवाई होणार की चौकशी आडून केवळ दबाव तंत्र वापर करुन हे सत्ताधारी पक्षात गेले की क्लिनचीट देणार ?


बरं लाच लुचपत विभाग एवढेच कार्यतत्पर असेल तर तत्कालीन पालकमंत्री विद्यमान आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिनांक 28/9 /2024 रोजी दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीमध्ये जिल्हा परिषदेच्या बड्या अधिकाऱ्याने प्रति महिना दहा कोटीची लाच ऑफर दिल्याचे जाहीरपणे सांगितले होते. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत आम्ही 30 सप्टेंबर 2024 रोजी लाचलुचपत विभागास या विषयाची सखोल चौकशी करून कारवाई करण्या संदर्भातील निवेदनही दिले होते. लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा असताना सदर निवेदन देऊन आज पाच सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत गेली तीन वर्षे विरोधी पक्षातील अनेकांची तत्परतेने चौकशी करणाऱ्या लाचलुचपत विभागाने अद्याप पर्यंत काहीच कारवाई केलेली दिसत नाही.


त्यामुळे एसीबीची कारवाई ही केवळ सत्ताधारी पक्षासाठी विरोधकांवर दबावाच राजकारण करण्यासाठी करत असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.

rapan bottom