Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चौके : गावातील एका बालकाच्या अंत्यविधीला जाताना भीषण अपघात

चौके : गावातील एका बालकाच्या अंत्यविधीला जाताना भीषण अपघात

चौके व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार राणे यांचा दुर्दैवी मृत्यू

चौके गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा

मालवण : मालवण तालुक्यातील चौके गावातील एका छोट्या मुलाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या चौके आदर्श व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार हिरोजी राणे (वय 54) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी चौके स्मशानभूमी नजीन रस्त्यावर घडली. मागाहून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने हा अपघात घडला. यां प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकुमार राणे हे चौके गावासह पंचक्रोशीत घराघरात एक हक्काचा माणूस म्हणून ओळखळे जात. मंगळवारी गावातील कुळकरवाडी येथे व्यापारी बांधव किरण गावडे यांच्या तीन वर्षाच्या मुलाचा अल्पशा आजाराने अचानक झालेल्या निधनाच्या दुःखात सहभागी होते. या छोट्या मुलाच्या अंत्यविधीसाठी चौके स्मशानभूमीकडे दुचाकीवरून डबलसीट जात असताना स्मशान भूमीजवळच रस्त्यावर मागाहून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात नंदू राणे यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठया प्रमाणात रक्तत्राव झाला. त्यांना तात्काळ चौके ग्रामीण रुग्णालयात नेत प्राथमिक उपचार करत रुग्णवाहिकेने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी अटोकात प्रयत्न करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नना यश आले नाही. डोळ्यादेखत अपघात होहूनही नंदूला वाचवता आले नाही याचीच खंत सर्वांनाच चटका लावून गेली.

नंदू हे राणे कुटुंबातील कर्ताकमवते होते. चांगले शिक्षण घेऊनही नोकरी न करता वडिलोपार्जित किराणा दुकानाचा व्यवसाय शेती करत असायचे. नंदू यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राणे कुटुंबावर मोठे संकट ओडवले आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, विवाहित बहिणी- भावोजी, मुंबईस्थीत काका काकी, चुलत भाऊ आसा परिवार आहे. नंदू राणे यांच्या अकाली निधनाची बातमी समजतात चौके गावासाह संपूर्ण चौके पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.नंदू राणे यांची अंतयात्रा बुधवारी सकाळी 9 वाजता चौके बाजारपेठ येथील निवासस्थानावरून निघणार आहे.

मंगळवार सकाळ चौके गावासाठी दुःखाची लाट घेऊन येणारी ठरली. दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपुर्ण गाव शोक सागरात बुडाला आहे.

सकाळीच चौके कुळकरवाडी येथील तीन वर्षाचा शौनक किरण गावडे याची प्राणज्योत मालवली. किरकोळ आजारातून मालवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच गावातील सर्वांनीच कुळकरवाडी येथील गावडे यांच्या घरी धाव घेत गावडे कुटुंबाला धीर दिला. कुमार शौनक यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी आजोबा, आते असा परिवार आहे.

दुःखद वातावरणात बालकांच्या अंतविधीसाठी जात असताना दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात चौके स्थळकरवाडी येथील किराणा व्यापारी.आदर्श व्यापारी संघ चौके अध्यक्ष तसेच धार्मिक सामाजिक शैक्षणिक.. क्रीडा क्षेत्रात सदैव असणारे.. नंदकुमार हिरोजी राणे (54) यांचा चौके येथील व्यावसायिक नंदकुमार हिरोजी राणे यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला अन संपुर्ण चौके गाव सुन्न झाला.

तीन वर्षीय बालकाच्या मृत्यू नंतर दुःखात असणाऱ्या चौके ग्रामस्थांसाठी हा मोठा धक्का होता. सर्वजण शोकसागरात बुडून गेले. बाजारपेठ बंद ठेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

rapan bottom