Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

ढाबा मालकासह कामगारांना लाथाबुक्क्यानी मारहाण

कुंभारमाठ येथे मध्यरात्री घडली घटना

सात संशयितांवर गुन्हे दाखल ; एकजण पोलिसांच्या ताब्यात

मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर मध्यरात्रीच्या वेळी जेवण दिले नाही या रागातून काही तरुणांच्या जमावाने हॉटेल मालक व कामगारांना लाथाबुक्क्यानी व बटलीने मारून गंभीर दुखापत केली. हॉटेल मधील साहित्याची तोडफोड करून मोबाईलही आपटून फोडला. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन व अंगठी जबरीने चोरून नेताना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ढाबा मालक बलजिंदर निर्मल सिंह मूळ रा. राजस्थान यांनी मालवण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी वैभव मयेकर (रा. धुरीवाडा मालवण) याच्यासह अनोळखी सहा जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. मालवण कुंभारमाठ येथील खालसा धाब्यावर सोमवारी रात्री १२: ४५ वा. सुमारास वैभव मयेकर व अन्य सहा जण जेवण करण्यासाठी गेले होते मात्र हॉटेल बंद झाले असल्याने जेवण दिले नाही. यां रागातून संशयीत तरुणांनी हॉटेलचे मालक बलजिंदर निर्मल सिंह, कामगार प्रदीप उगले यांना गंभीर मारहाण केली. हॉटेलच्या साहित्याची तोडफोड करत सोन्याच्या दागिन्यांचीही चोरी केली. उद्यापासून हॉटेल बंद करायचे नाहीतर तुम्हांला जिवंत सोडणार नाही. अशी धमकीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वैभव मयेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे करत आहेत.

rapan bottom