भावई मंदिर येथे होणार महाआरती
निलेश जोशी | कुडाळ : शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता झाराप येथील श्री देवी भावई मंदिर येथे सकल हिंदू समाज जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचीही महाआरतीसाठी उपस्थिती असणार आहे. सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी उद्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ३:३० वाजता हॉटेल आर. एस. एन. कुडाळ हायवे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले आहे.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झारापमध्ये उद्या "सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती"
