Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

झारापच्या 'त्या' मारहाण  प्रकरणाचा मुस्लिम समाजाने केला निषेध

झारापच्या 'त्या' मारहाण  प्रकरणाचा मुस्लिम समाजाने केला निषेध

ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आपली बाजू

भविष्यात अशा वाईट प्रवृत्तींना थारा देणार नसल्याचे केले स्पष्ट

निलेश जोशी | कुडाळ : काही दिवसांपूर्वी झाराप येथे पर्यटकांना मारहाण झाली त्या प्रकरणाचा झाराप मधील मुस्लिम समाज निषेध करतो. झालेली घटना निंदनीय असून अशा वाईट प्रवृत्तींना आम्ही अजिबात थारा देणार नाही. आम्ही त्या गोष्टीचे समर्थनही करत नाही आणि त्याला पाठिंबाही देत नाही, असे झारापचे ग्रामस्थ रफिक शेख यांनी गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने स्पष्ट केले आहे. झाराप गावातील काही मुस्लिम समाजातील ग्रामस्थांनी आज कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
      झाराप झिरो पॉईंट येथे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी पुण्याहून गोव्याला जाणारे पर्यटक चहा साठी थांबले होते. त्यांच्या चहात माशी पडल्याचे निमित्त झाले आणि ते विचारणाऱ्या पर्यटकाला सहा जणांनी मिळून मारहाण केली. दोरीने बांधून ठेवले. कोणीतरी ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यावर त्या पर्यटकांची सुटका झाली. त्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उमटले होते. सकल हिंदू समाजाने याबाबत पोलिसांना निवेदन दिले होते. आमदार निलेश राणे यांनी पोलिसांना ४८ तसंच अल्टिमेटम देत ती अनधिकृत चहाची टपरी पाडण्याचा इशारा सुद्धा दिला होता. त्यांनतर पोलीस प्रशासन आणि ग्राम पंचायत यांनी ती टपरी पाडली होती. या पार्श्वभूमीवर आज झाराप मधील मुस्लिम बांधवानी आज कुडाळ मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी मुनाफ खान, तरबेज आजगावकर, आसिफ मुजावर, वहाब डिचोलकर उपस्थित होते.
     यावेळी बोलताना रफिक शेख म्हणाले, काही दिवसांपूर्वी झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक त्याच्यातून जे काय गोष्टी वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून बाहेर यायला लागल्या. त्या त्यांच्या प्रकरणाशी आमच्या गावातील मुस्लीम समाजाचा काहीही संबंध नाही.  जी काही मारहाणीची  घटना घडली त्याचा मी गावाच्या वतीने त्याचा निषेधच करतो.  त्याला आमचे  समर्थन नाही.  पण काही बातम्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत येऊ लागल्या, त्यामुळे  हि पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू आम्ही मांडत आहोत.
   श्री. शेख पुढे म्हणाले, मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा वाईट प्रवृत्तीला आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचे समर्थन पण नाही.  फक्त एवढंच आहे की ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये.  म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसार माध्यमाच्या द्वारे सर्व सिंधुदुर्गवासीयांपर्यंत आम्हाला हे  पोचवायचे आहे.  आमचे घडलेल्या गोष्टींना समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही.  उलट सोमवारी  संध्याकाळी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन ती टपरी पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी  आम्ही गावातले काही व्यक्ती उभे राहून अनधिकृत जी टपरी होती ती सुद्धा त्या ठिकाणी हटवलेली आहे.  आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही किंवा आम्ही कोणाला संपर्क केलेला नाही.  फक्त आमच्या मुस्लिम समाजाचा नाव कुठेतरी बदनाम होऊ नये आणि त्याला वेगळे वळण वळून मिळू नये त्याच्यासाठी आम्ही हे प्रसार माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असे श्री. शेख यांनी शेवटी सांगितले.

rapan bottom