स्काय न्यूज टुडे | आचरा : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा येथे गुरुवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी स्पर्धकाने प्रसिद्ध लेखक कै. जयवंत दळवी यांच्या कोणत्याही पुस्तकावर कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १० मिनिटे परीक्षणात्मक बोलायचे आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून प्रथम येणाऱ्या १० स्पर्धकांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या तीन क्रमांकांना अनुक्रमे १५००, १२००, १००० रुपये व चषक तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. नावनोंदणीची ग्रंथपाल विनिता कांबळी (९४२१२६३३४६) व ०२३६५-२४६०१७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्यावतीने करण्यात आले आहे.

