Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत टोपिवाला हायस्कुलच्या पालक सौ. मिरा तोतरे प्रथम

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत टोपिवाला हायस्कुलच्या पालक सौ. मिरा तोतरे प्रथम

स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : मालवण-केंद्रातील शाळांची प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय स्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रघुनाथ देसाई विद्यालय या प्रशालेत तृणधान्य पाककला कृती स्पर्धा घेण्यात आली. स्वयंपाकी, मदतनीस, ग्रामस्थ, पालक यांनी स्पर्धेत भाग घेतला.

प्रथम क्रमांक सौ. मिरा सखाराम तोतरे पाककृती-तृणधान्याचे धपाटे (टोपीवाला हायस्कुल), द्वितीय सौ. जान्हवी रामचंद्र चव्हाण, मक्याचे कटलेट (एम. एम. परुळेकर प्राथमिक शाळा), तृतीय सौ. प्रिया गणेश मोरजकर नाचणीचे अप्पे(भंडारी प्राथ.शाळा) उत्तेजनार्थ - सौ. पिंगल विकास रुपनर तृणधान्याचे धपाटे (र. दे. विद्यालय मालवण) सौ. रेणुका मंगेश करलकर (जि. प.शाळा मालवण देऊळवाडा), सौ.रिया राजेश वराडकर नाचणीचे घावणे (दांडी मालवण शाळा) यांना गौरवण्यात आले.

पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला, अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात.

स्पर्धेचे परिक्षण मास्टर शेफ विजेत्या सौ. आरती कांबळी-वायंगणकर, नितीन पाटिल, संदीप गावडे यांनी केले. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.

सर्व विजेत्या स्पर्धकांचा विशेष सन्मान व गौरव मालवण वरिष्ठ विस्तार अधिकारी उदय दीक्षित, मालवण केंद्रप्रमुख शिवराज सावंत, सौ.आरती कांबळी, वायंगणकर , नितीन पाटिल, संदीप गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सौ.श्वेता यादव, सौ.अमृता राणे, सौ.आदिती ठाकुर, सौ. चित्रा गुंजाळ उपस्थित होते. तालुकास्तरीय पाककला स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सौ. मिरा सखाराम तोतरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

rapan bottom