Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवतांचा वेशी फिरणे सोहळा

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवतांचा वेशी फिरणे सोहळा

१४ फेब्रुवारीपर्यंत चालणार कार्यक्रम

मालवण | प्रतिनिधी : जागृत देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर आपल्या देवदेवता व बारा-पाच पंचायतनासह मानाची तरंगकाठी, देव रामेश्वराची पालखी, त्यावर चौऱ्या घालणारे सेवेकरी, निशाणकाठी, अब्दागीर व तमाम रयतेसह सनईच्या स्वरात व ढोल-ताशांच्या गजरात वेशी फिरणे सोहळ्यास निघाले. देव आपल्या रयतेसह १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या चतुःसीमा भेट कार्यक्रमासाठी रविवारी निघाले.

या मार्गात भाविकांनी मोठ्या उत्साहात श्री देव रामेश्वराचे स्वागत करत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. श्री देव रामेश्वर ज्या-ज्या मार्गाने जाणार आहेत, त्याठिकाणी आकर्षक रोषणाई, गुढ्या, पताका, रांगोळीसडा घालून ग्रामस्थ आपल्या देवाच्या भेटीसाठी आतुरलेले दिसून आले. पहिल्या दिवशी कोळंब येथील मांगरीमध्ये मुक्काम असणार आहे.

कांदळगाव येथील देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वपार परंपरेनुसार चालत आलेला स्वयंभू देव रामेश्वर पालखी, तरंग, राणे परव मानकरी आणि रयत मंडळींसह वाजत-गाजत चतुःसीमा (वेशी फिरणे) या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. हा कार्यक्रम १४ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे, कोळंब, न्हिवे, महान अशी गावे घेत पुन्हा श्री देव रामेश्वर कांदळगाव याठिकाणी आपल्या राऊळात परतणार आहेत. या कालावधीत ठिकठिकाणीच्या देवस्थानच्या मेटी, भाविकांना आशीर्वाद देत हा कार्यक्रम चालणार आहे. आज भाविकांनी उत्स्फूर्त गर्दी करत श्री देव रामेश्वर चतुःसीमा फिरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता.

नित्यनियमाने आपण ग्रामदेवतेच्या मंदिरात देवदर्शनासाठी जातो व आपली इच्छा त्याच्यासमोर प्रकट करतो व ती पूर्ण होण्याची मनिषा बाळगतो. कालांतराने आपली मनिषा परिपूर्ण होते. परिणामी देवावरील आपली श्रद्धा दृढ होते. हेच ग्रामदैवत आपल्या भाविक रयतेला दर्शन देण्यासाठी दर तीन वर्षांनी त्यांच्या वस्त्या-वस्त्यांनी आगमन करते, तेथे प्रगट होते. केवळ रयतेला दर्शनच देऊन न थांबता, त्यांची सुख-दुःखे जाणून घेणे, त्यांच्या समस्यांचे निवारण करणे हेच त्यांचे प्रमुख ब्रीद असते, वचन असते. या चतुःसीमा मेट दिवसात तमाम भाविक, रयतेत आनंदी वातावरणात असते. आपली मरगळ झटकून नव्या उमेदीने, नवचैतन्याने रयत उभी राहते. संपूर्ण गावात मनापासून स्वच्छता अभियान राबविले जाते. दारोदारी आनंदाच्या गुढ्या उभारल्या जातात. स्वागताच्या कमानी, स्वागताचे फलक, रांगोळ्या सडा-सारवण केले जाते. देवतांच्या आगमनावेळी अगरबत्त्या, धूप, कापूर, अत्तरे यांचा सुवास आसमंतात दरवळत असतो. जागोजागी देवांना ओवाळण्यात येते. गंगाजलाने पाय पवित्र केले जातात. मांगल्य, पावित्र्य जपले जाते. जागोजागी स्वर्गीय सुखाचा आनंद साकारतो. सर्व सुख-दुःखे विरून जातात. भक्ती-बुद्धी-आनंद यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच रामेश्वराची चतुःसीमा भेट असा कार्यक्रम असतो.

सोमवारी कोळंब मांगरी येथील देव महापुरुष येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर न्हिवे येथे प्रस्थान, ११ रोजी दुपारी न्हिवे येथे महाप्रसाद, दुपारनंतर महान येथे प्रस्थान, १२ रोजी दुपारी महान गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद, दुपारनंतर कांदळगाव सातेरी मंदिरकडे प्रस्थान, १३ रोजी सकाळी सातेरी मंदिरातून कांदळगाव-साळकरवाडी येथे प्रस्थान, तेथून पुन्हा माघारी येताना परबवाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद, दुपारनंतर रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान, १४ रोजी रवळनाथ मंदिर येवून राणेवाडी येथे प्रस्थान, दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद, दुपारनंतर रामेश्वर मंदिर येथे रवाना, रात्री रामेश्वर मंदिर येथे पाच दिवसीय देशी फिरणे कार्यक्रमाची रीतीरिवाजनुसार सांगता करण्यात येणार आहे.

फोटो : कांदळगावचे ग्राम दैवत श्री. देव रामेश्वर वेशी फिरणे सोहळ्यास सुरवात झाली. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. (अमित खोत, मालवण)

rapan bottom