Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे माझ्यासाठी देवदुतच!

आमदार निलेश राणे माझ्यासाठी देवदुतच!

कबड्डी खेळाडूने मानले आभार

राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुप मार्फत लिलावती हॉस्पिटल मध्ये हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

मालवण | प्रतिनिधी : कबड्डी खेळताना हाताला गंभीर दुखापत झालेल्या एका कबड्डी खेळाडूला उपचार मिळवून देण्यात आमदार निलेश राणे खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहेत. राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या माध्यमातून लिलावती हॉस्पिटल मध्ये हाडांच्या तज्ञ डॉक्टर कडून कबड्डी खेळाडूच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

अभिषेक नलावडे हा एक चांगला कब्बड्डीपट्टू आहे. कब्बड्डी खेळताना त्याचा उजव्या हाताच्या खांद्याचा खिळा उखडला. शास्त्रक्रिया करणारे हाडांचे सर्वात चांगले डॉक्टर लिलावती हॉस्पिटलला असतात. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून मी पुन्हा कबड्डी खेळू शकेन यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. तुमच्या राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुप च्या माध्यमातून मला मदत मिळावी. संकेत बावकर, महेश मनोहर पावसकर यांसोबत मी असतो. अशी माहिती अभिषेक याने आ. निलेश राणे यांना दिली. काही मिनिटात आ. निलेश राणे यांचा कॉल येतो, अभिषेक तु काळजी करू नको तुझी इच्छा आहे ना परत कब्बड्डी खेळायची तर ती मी पूर्ण करणार. तु जराही काळजी करू नको. तुझे ऑपरेशन लिलावती हॉस्पिटलला तुला ज्या डॉक्टरकडून आवश्यक आहे त्यांच्याकडून करून देईन. हे आमदार निलेश राणे याचे शब्द अभिषेक यांना मोठा दिलासा देणारे होते.

आयुष्यात पुन्हा कबड्डी खेळणार हा विश्वास देणारे होते. आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे राणे प्रतिष्ठानच्या मेडिकल ग्रुप च्या माध्यमातून अभिषेक यांच्या हातावर यशस्वी शास्त्रक्रिया काही दिवसांपूर्वी करण्यात आली.नुकतीच काळाचौकी येथे कबड्डी का महाकुंभ या कबड्डी टूर्नामेंटला प्रमुख पाहुणे म्हणून आ. निलेश राणे आले असता आभिषेक याने महेश पावस्कर, संकेत बावकर यांच्या सोबत आ. निलेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. आ. निलेश राणे खऱ्या अर्थाने देवदूत असल्याची भावना त्यावेळी व्यक्त करण्यात आली.

rapan bottom