Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आचरानगरी रामेश्वराच्या भेटीने धन्य जाहली !

आचरानगरी रामेश्वराच्या भेटीने धन्य जाहली !


शाही थाटाच्या डाळपस्वारी सोहळ्याची सांगता

बाजारपेठ मार्गावर जंगी स्वागत


सिद्धेश आचरेकर
स्काय न्यूज टुडे
आचरा : तीन वर्षांनी डाळपस्वारीच्या निमित्ताने श्री देव रामेश्वर आपल्या अन्य देवतांसह लेकरांना भेटण्यासाठी वाडीवस्तीत गेला. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या देव भेटीच्या अविस्मरणीय सोहळ्याने अखंड आचरे गावात चैतन्यपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झाले. सहा दिवस चालणाऱ्या डाळपस्वारीची सांगता शुक्रवारी मध्यरात्री झाली.

श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह आपल्या प्रजेच्या दारात गाऱ्हाणी ऐकण्यासाठी तसेच गावातील उपदेवदेवताच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेला होता. गुरुवारी सकाळी हिर्लेवाडी येथून नागझरी येथील पूर्वी आकारी मंदिरात आल्यानंतर देवाने विश्रांती घेतली. त्याठिकाणी सायंकाळी महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी देवाचे आचरा बाजारपेठेत जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या रक्षणकर्त्याच्या स्वागतासाठी व्यापारी बांधवांनी बाजारपेठ मार्ग सडा रांगोळी, पताका, गुढ्या अन्य सजावट करून सजविला होता. बाजारपेठ मार्गावर सर्व व्यापारी बांधव, रिक्षा संघटना यांच्या वतीने श्रींच्या स्वारीचे पूजन करण्यात आले



श्रींच्या स्वारीचे श्री देवी फुरसाई मंदिरमार्गे संपूर्ण बाजारपेठतून ओट्या स्वीकारत आचरा तिठा येथे आगमन झाले. संध्याकाळी नागोचीवाडी ब्राम्हणदेव येथे भाविकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर पारंपरिक वाटेने पारवाडी ब्राम्हणदेव मंदिरात रात्री स्वारी आली. पारवाडी येथे विसावल्यानंतर श्रीची स्वारी आपल्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकत तसेच डोंगरेवाडी येथील ग्रामस्थांच्या ओट्या स्वीकारत त्यांना आशीर्वाद देत गेली. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून गांगेश्वर मंदिरात शनिवारी पहाटे विसावली. तीन वर्षानी बोलणाऱ्या 'काळकाय' देवीच्या आश्वासक अभिवचनात या डाळपस्वारीची पहाटे सांगता झाली.

शेवटच्या रात्री देवाचे तरंग आपल्या प्रजाजनांसोबत रामेश्वराच्या पिंडीच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी रामेश्वराच्या प्रांगणातील पाषाणी पापडीवरील तरंगाच्या गतिमान फेऱ्या तसेच तरंगाच्या आणि पिंडीचा गळाभेटीचा सोहळा मन हेलावून टाकणारा ठरला. देवस्वारीच्या संपूर्ण मार्गावर अभय राणे यांच्या माध्यमातून रेड कार्पेट घालण्यात आले होते. बाजारपेठ मार्गावर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. व्यापारी संघटनेच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

rapan bottom