Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

संघटित, असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सहकार्य करणार!

संघटित, असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सहकार्य करणार!

मंत्री नितेश राणे यांची ग्वाही ; भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत विविध विषयावर केली सकारात्मक चर्चा

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच जिल्ह्यातील घरेलू कामगारांना शासन आदेशानुसार संसारोपयोगी भांडी संच मिळावा यासाठी प्रयत्न करणार. अशी ग्वाही राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय मजदूर संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधींना दिली. अशी माहिती जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, कोकण विभाग संघटनमंत्री भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब व जिल्हा कोषाध्यक्ष ओंकार गुरव उपस्थित होते. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनेक जिल्ह्यात संसारोपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑगस्ट २०२४ अखेर पर्यत १,४९५ एवढे घरेलू कामगार आजही भांडी संचापासून वंचित असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव, कंत्राटी कामगार कायद्याची अमंलबाजावणी अशा प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना विनंती करण्यात आली. यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहितीही श्री.परब यांनी दिली.

rapan bottom