Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

राहुल चव्हाणच्या गौरव रॅलीत मालवण नगरी एकवटली

राहुल चव्हाणच्या गौरव रॅलीत मालवण नगरी एकवटली

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात राहुलने केले होते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

महाराष्ट्राने प्राप्त केला तिसरा क्रमांक

अमित खोत | मालवण : दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा कृ .सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित, स. का. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या, एनसीसी विभागाचा सीनियर अंडर ऑफिसर राहुल उषा उदय चव्हाण याची कामगिरी ऐतिहासिक व अभिमानास्पद राहिली. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना फ्लॅग एरियामध्ये महाराष्ट्राला तिसऱ्या स्थानावर रँकिंग प्राप्त करून देण्यात राहुलने महत्वाची भुमिका बजावली. दरम्यान, शुक्रवारी मालवण येथे दाखल झालेल्या राहुल चव्हाणच्या स्वागतार्थ गौरव रॅली काढण्यात आली. यावेळी मालवण नगरी एकवटली.

राहुल चव्हाण याचा हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि मालवण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद राहिला. राहुल चव्हाण याचा डायरेक्टर जनरल एनसीसी, महाराष्ट्राचे राज्यपाल, 56 महाराष्ट्र बटालियन या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. आरडीसी परेड मध्ये सहभागी होण्याचा हा सन्मान इतिहासामध्ये प्रथमच मालवणच्या सुपुत्राला प्राप्त झाला.

सहा महिन्यापासून परेड सराव दृष्टीने दिल्ली येथे असलेल्या राहुलचे दिल्लीहून मालवणमध्ये आगमन होत आहे, तरी या निमित्ताने 7 फेब्रुवारी रोजी राहुलच्या सन्मानार्थ गौरव रॅली आयोजित करण्यात आली. कुंभारमाठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून रॅली सुरु झाली. त्यानंतर देऊळवाडा, भरड नाका, बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ, कन्याशाळा मार्गे स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये सांगता झाली.

कुंभारमाठ येथे उपस्थित अनेक मान्यवरांनी, संस्था प्रतिनिधी व नागरिकांनी राहुल याला पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर सजविलेल्या गाडीतून कुंभारमाठ येथून देऊळवाडा ते भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते कन्याशाळा मार्गे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय अशी राहुल याची गौरव रॅली काढण्यात आली. यावेळी समस्त मालवणवासीय मोटासायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत ठिकठिकाणी नागरिकांनी राहुल याचे स्वागत केले.

या रॅलीत राहुल याची आई सौ. उषा चव्हाण, वडील उदय चव्हाण, भाऊ भूषण चव्हाण, यांच्यासह सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल दीपक दयाल, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, कृ.सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सेक्रेटरी गणेश कुशे, सीडीसी अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, साईनाथ चव्हाण, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, माजी प्राचार्य श्रीपाद गीरसागर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय चव्हाण, अभय कदम, उमेश मांजरेकर, किसन मांजरेकर, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, अमेय देसाई, प्रा. सुमेधा नाईक, सौ. शिल्पा खोत, सौ. फॅनी फर्नांडीस, महेश कारेकर, उत्तम पेडणेकर लक्ष्मीकांत खोबरेकर, सुधीर धुरी, प्रदीप नाईकसाटम, ललित चव्हाण, शुभम सकपाळ, रविकिरण तोरसकर, शैलेश पावसकर, रुजारिओ पिंटो, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, प्रभाकर देऊलकर, वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब, मालवण नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आदी तसेच सिंधुदुर्ग कॉलेजचे सर्व प्राध्यापक, एनसीसी कॅडेट, विद्यार्थी विद्यार्थिनी, मालवणातील सामाजिक संस्था नागरीक यांनी या रॅलीत सहभागी होत राहुल याचे स्वागत केले.

रॅलीनंतर सिंधुदुर्ग महाविद्यालयात राहुल चव्हाण याचा बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करण्यात करण्यात आला. तसेच राहुल त्याचे आई वडील आणि राहुलच्या यशात मेहनत घेणारे कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर, कॉलेजचे एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांचाही सत्कार करण्यात आला.

*या यशात सर्वांचे योगदान : राहुल चव्हाण*

सत्काराला उत्तर देताना राहुल चव्हाण म्हणाला, प्रजासत्ताक दिन परेड मध्ये पोहचण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता, अनेक टप्प्यावर निवड प्रक्रिया पार करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. दिल्लीत थंडीच्या हवामानात शिस्तबद्ध आणि मेहनतीने प्रशिक्षण पूर्ण करत परेड यशस्वी करत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळाला. या यशात आई वडील, ५८ महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी, एनसीसी अधिकारी व कॉलेज यांचे योगदान आहे. इतर एनसीसी कॅडेटसने देखील मेहनत करत राहावी, असेही राहुल चव्हाण म्हणाला. यावेळी कर्नल दीपक दयाल, श्रीपाद गीरसागर, बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करत राहुल याचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले तर आभार डॉ. खोत यांनी मानले.

फोटो : राहुल चव्हाण यांचे भव्य स्वागत मालवण वासियांकडून करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

फोटो : राहुल चव्हाणच्या स्वागतार्थ गौरव रॅली काढण्यात आली. (अमित खोत, मालवण)

फोटो : सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे राहुल चव्हाण याचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. (अमित खोत, मालवण)

rapan bottom