Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष पदी नारायण माने, संघटक श्याम कदम तर सचिव पदी प्रमोद शेठ

वैभववाडी | प्रतिनिधी : ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या "ग्राहक पंचायत महाराष्ट्र" संस्थेची देवगड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी श्री.नारायण माने, संघटक पदी श्री.श्याम कदम तर सचिवपदी श्री.प्रमोद शेठ यांची एकमताने निवड करण्यात आली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका शाखा स्थापनेसाठी संस्थेच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सभा संस्थेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी व वैभववाडी तालुका शाखा सल्लागार श्री. शैलेंद्रकुमार परब यांच्या उपस्थितीत जामसंडे- देवगड येथे संपन्न झाली.


यावेळी मोहन पाटील, लक्ष्मण पाताडे, प्रल्हाद मालवणकर, गीता लळीत, स्वप्ना केळकर, नारायण माने, पुजा जाधव, श्याम कदम, रघुनाथ बोडेकर, दिपीका मेस्त्री, प्रमोद शेठ, राजेंद्र हिंदळेकर, सुनिल मेस्त्री, दयानंद मांगले, शरयु ठुकरुल, दयानंद तेली व विजय कदम आदी आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते.


जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची स्थापना, रचना, तत्वज्ञान व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देऊन या अराजकीय विधायक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेल्या कार्य व उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन व ग्राहकाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य केले जाते असे सल्लागार शैलेंद्रकुमार परब यांनी सांगितले. उपस्थितांचे शंका समाधान झाल्यानंतर सर्वांनुमते देवगड तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
तालुका अध्यक्ष- श्री. नारायण रंगराव माने, उपाध्यक्ष- पुजा विलास जाधव, संघटक- श्याम मधुकर कदम, सहसंघटक- रघुनाथ धुळाजी बोडेकर, सहसंघटक महिला- दिपीका दिनकर मेस्त्री, सचिव- प्रमोद अनंत शेठ, सहसचिव- मोहन ज्ञानदेव पाटील, कोषाध्यक्ष- सुनील काशीराम मेस्त्री, सल्लागार- प्रल्हाद शिवराम मालवणकर, प्रसिद्धीप्रमुख- दयानंद यशवंत मांगले, कार्यकारिणी सदस्य शरयू शरद ठुकरूल तसेच दयानंद अर्जुन तेली, गीता गजानन लळीत, स्वप्ना सुनील केळकर व विजय हरी कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.


देवगड तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिल्यानंतर श्री‌.नारायण माने यांनी मनोगतात सांगितले की, आपण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार लोकशाही मार्गाने ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका शाखेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. देवगड तालुक्यातील ज्या व्यक्तींना या ग्राहक चळवळीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी देवगड तालुका शाखेची संपर्क साधावा असे आवाहनही केले. शेवटी माजी अध्यक्ष लक्ष्मण पाताडे यांनी सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन करून सर्वांचे आभार व्यक्त केले.

rapan bottom