खारभूमी अधिकाऱ्यांनी केली पाहाणी
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती
मालवण : चिंदर त्रिंबक बांदिवडे या गावातील गडनदी पात्र दिवसेंदिवस रूंद होत आहे. नदी किनारी असलेली घरे आणि अनेक वर्षे करत असलेल्या पारंपरिक शेतीच प्रचंड नुकसान होत आहे. फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे. येथील बंधारा होणे आवश्यक असल्याने खार भूमी अधिकारी (डेप्युटी) जाधव यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, संतोष गावकर, आबा लबदे, विनोद लबदे, अक्षय साटम, सुरेश साटम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

