Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या वतीने अभिनंदन

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या वतीने अभिनंदन

कामगार नोंदणी ऑनलाईन साईट सर्वांसाठी खुली केल्याबद्दल मानले आभार

मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाईन करण्यासाठीची साईट भारतीय मजदूर संघ पदाधिकारी यांच्या सोबत झालेल्या मंत्रालय स्तरावरील बैठकीच्या मागणीनुसार सर्वांसाठी खुली करून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या वतीने कामगार मंत्री यांचे अभिनंदन करण्यात आले.

भारतीय मजदूर संघातर्फे, केंद्र सरकारने कामगार कायद्यांचे ४ लेबर कोड मध्ये रूपांतर केल्याच्या पार्श्वभूमीवर मजदूर संघाची भूमिका विषद करण्यासाठी ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था परेल मुंबई येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ऍड.आकाश फुंडकर उपस्थित होते.

त्यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ साईट सर्वांसाठी खुली करून महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना दिलासा दिल्याबद्दल बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या वतीने अभिनंदन केले.

यावेळी भारतीय मजदूर संघ प्रदेश अध्यक्ष ऍड. अनिल ढुमणे, क्षेत्रीय संघटन मंत्री सी.व्ही.राजेश, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, श्रीपाद कुटासकर,प्रविण जाधव, ओमकार गुरव, जयंत शेटये उपस्थित होते

rapan bottom