Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

डॉ. प्रमोद वालावलकर यांचा १६ फेब्रुवारी रोजी नागरी सत्कार

डॉ. प्रमोद वालावलकर यांचा १६ फेब्रुवारी रोजी नागरी सत्कार

कुडाळवासियांच्या वतीने होणार हृद्य सत्कार

सत्कार समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर यांची माहिती

निलेश जोशी | कुडाळ : डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर. वालावल गावचे सुपुत्र आणि कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉ. प्रमोद वालावलकर यांची आहे. म्हणूनच त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन कुडाळ शहरवासीय व राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बॅरिस्टर नाथपयी शैक्षणिक संकुल एमआयडीसी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय डॉक्टर वालावलकर प्रेमींनी घेतला आहे. अशी माहिती समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर यांनी दिली. साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाट यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे असे श्रीमती परुळेकर यांनी सांगितले त्या आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.


कुडाळ शहरवासीय व डॉक्टर वालावलकर यांच्या चाहत्यांची बैठक आज मराठा समाज हॉलमध्ये झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. डॉक्टर वालावलकर हे राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढले. कुडाळसह संपूर्ण तालुका व परिसरातील रुग्णांसाठी डॉक्टर वालावलकर यांनी चांगली सेवा दिली. ते सर्वांमध्ये लोकप्रिय ठरले, म्हणून आम्ही त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर वालावलकर यांना सत्कार केलेला आवडणार नाही म्हणून त्यांचे विचार ऐकण्यासाठी विचार मंथन करावे असा विचार पुढे आला व तशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरी सत्कारासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे. 16 रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळात हा नागरी सत्कार होणार आहे, असे कमलताई परुळेकर यान सांगितले.


यावेळी ऍड. सुहास सावंत, संजय वेतुरेकर, दयानंद चौधरी, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, अतुल बंगे, धीरज परब, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, अभय शिरसाट, सौ मेघा सुकी, श्रीराम शिरसाट, संदीप साळस्कर, विजय वालावलकर, संदीप निंबाळकर, भारती पेडणेकर, राजन नाईक आणि अन्य उपस्थित होते.

rapan bottom