मालवण : नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था नेमळे सावंतवाडीचा प्रतिष्ठित समजला जाणारा 'जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार' माध्यमिक विद्यालय बिळवस मालवण मधील सौ. अनुष्का नागेश कदम यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी कै. प्रमिला शिवराम जाधव स्मृती प्रित्यर्थ उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार दिला जातो, यावर्षीचा हा पुरस्कार माध्यमिक विद्यालय, बिळवस मधील उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना प्रशालेच्या प्राचार्या श्रीम. कल्पना बोवलेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ स्वरूपात प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिवराम दळवी, संस्थाध्यक्ष आत्माराम राऊळ, सांस्कृतिक प्रमुख अनिल कांबळे, नितीन धामापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. अनुष्का कदम यांनी या अगोदर कृती संशोधन, निबंध लेखन मध्ये सुयश प्राप्त केले आहे. विविध विषयावर समाज प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत, त्यांच्या या सूयशाबद्दल ग्रामसेवक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सेक्रेटरी अशोक पालक, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, तसेच सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

