मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका शिवसेना कार्यालयात हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. बहुसंख्य महीला भगीनीनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.
यावेळी शिवसेना महीला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा समन्वयक साै. अंजना सामंत, महीला उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, तालुका प्रमुख आशा वळपी, उपतालुकाप्रमुख कुडाळ साै. अनघा रांगणेकर, उपतालुकाप्रमुख गीता नाटेकर, विभाग प्रमुख निकिता तोडणकर, लुडडीन फर्नांडिस, सायली राणे, शुभांगी परब, शाखाप्रमुख रुपाली जुवटकर, समीक्षा शिंदे, वेदिका शिंदे इत्यादी व इतर महीला शिवसैनिक उपस्थित होत्या.
महिला पदाधिकारी यांच्या विनंतीवरून शिवसेनेचे पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, शिवसेना कुडाळ-मालवण क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांचीही उपस्थिती शाखा कार्यालयात होती.

