Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथे पुन्हा उभारणी होत असलेल्या पुतळ्याचे काम दर्जेदार!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथे पुन्हा उभारणी होत असलेल्या पुतळ्याचे काम दर्जेदार!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची मालवण येथे पत्रकार परिषद

यापूर्वीच्या कामाबाबत पुन्हा एकदा बांधकाम विभागाला केले लक्ष

मालवण : राजकोट येथील शिवपुतळा कोसळण्याच्या कामामध्ये कणकवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचीही चौकशी होवून कारवाई होणे आवश्यक होते. ठेकेदाराला काम देताना त्याच्याकडून होत असलेल्या कामाच्या दर्जाबद्दल देखरेख करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची होती, असे असताना फक्त ठेकेदाराला दोषी ठरवून बांधकामच्या अधिकाऱ्यांना बाजूला करणे चुकीचे आहे. मात्र आता जागतिक कीर्तीचे मुर्तीकार सुतार आहेत. त्यांच्याकडून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जात आहे, यामुळे ही आनंदाची बाब आहे. असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, महेश जावकर, मनोज मोंडकर, सिद्धार्थ जाधव, दत्ता पोईपकर, विनोद सांडव, यशवंत गावकर, संदीप लाड, निनाक्षी शिंदे, भाग्यश्री खान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री. उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती झाल्यापासून मालवण तालुका बांधकाम विभाग सावंतवाडी विभागाला जोडला होता तो नियमबाह्य शासनाच्या नियमानुसार नसताना कणकवली विभागाला जोडून पुतळा बांधण्याचं काम आणि हेलिपॅड बांधण्याचे काम करण्यासाठी तत्कालीन मंत्र्यांच्या पीएच्या माध्यमातून हा खटाटोप करण्यात आला होता. यात कार्यकारी अभियंता यांचाच पुढाकार होता. पुतळा कोसळला त्याला जबाबदार खऱ्या अर्थाने ते कार्यकारी अभियंता आहेत. यामुळेच आज परत शासनाने मालवण तालुका पुन्हा सावंतवाडीला जोडला म्हणजे त्यावेळी किती अरेरावी होती हेच समजून येत आहे. शिल्पकार आपटे हा पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारे कणकवलीमध्ये एका पुतळ्याच्या कामासाठी आला होता, त्याने बनविलेल्या पुतळ्याचा हात खूपच लांब झाल्याने तो पुतळा उभारण्यातच आला नव्हता, तो आजही कुठेतरी ठेवण्यात आला आहे. सध्याच्या पालकमंत्र्यांच्या बरोबर आपटेचे फोटो त्यावेळचे आहेत, असेही श्री. उपरकर यांनी सांगितले.

आता त्याठिकाणी काम करत असताना जुन्या बांधकामातील सर्वच्यासर्व स्टील हटविण्यात आले आहे. यामुळे त्यावेळी चुकीच्या पद्धतीनेच काम झाल्याने त्यातील एकही गोष्ट आता वापरण्यात येत नसल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे पुर्वीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. यामुळे कार्यकारी अभियंता यांच्यावर प्राधान्याने कारवाई करणे आवश्यक आहे असे उपरकर यांनी स्पष्ट केले.
छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे मालवणचे नाव अधिकारी वर्गाच्या चुकीच्या पद्धतीमुळे आणि घाईगडबडीमुळे खराब झाले आहे. ते आता नवीन पुतळा उभारल्यानंतर पुन्हा उंचीवर जाणार आहे आणि आतातरी शासनाने पुतळा उभारण्यासाठी घाई करू नये. दर्जेदार आणि कधीही न पडणारा पुतळा उभारण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे आतातरी शासनाने याकडे डोळसपणे बघावे, असाही टोला श्री. उपरकर यांनी लगावला आणि जिल्हा नियोजनच्या बैठकीत यावर एकही शब्द न काढल्याबद्दल शासनकर्त्यांचे लक्ष कशाप्रकारे जिल्ह्यात आहे, हेही दिसून येत आहे, असेही श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले.

rapan bottom