Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कामगारांची वेबसाईट सर्वांसाठी खुली

कामगारांची वेबसाईट सर्वांसाठी खुली

बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या प्रयत्नांना यश

अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती


निलेश जोशी | कुडाळ : कामगारांसाठी असलेली वेब साईट सर्वांसाठी खुली करावी यासाठी बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ही वेब साईट आजपासून सुरू झाली असल्याची माहिती अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


प्रसिद्धी पत्रकात श्री. चव्हाण म्हणतात, सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाशजी फुंडकर व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची मंत्रालय येथे व खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांची जुहू येथील अधीश बंगल्यावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते.

तसेच त्या नुसार पाठपुरावा चालू होता. कृती समिती प्रमुख प्रसाद गावडे, श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बावलेकर, निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, कोकण श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष संतोष तेली, इमारत बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष प्रकाश दळवी या सर्व संघटनेच्या अध्यक्ष यांनी कामगारांची साईट सर्वासाठी खुली करावी ही आग्रही मागणी करण्यात आली होती.


श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. श्री. आकाशजी फुंडकर साहेब व कामगार सचिव मान. श्री. विवेकजी कुंभार साहेब यांची भेट घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने गेला महिनाभर प्रयत्न सर्व संघटना अध्यक्ष यांच्या मार्फत पाठपुरावाही चालू होते. संयुक्तं समितीच्या पाठपुराव्याला आज यश संपादन झाले व आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सदर कामगार मंत्री व आयुक्त साहेबांनी सदर साईट चालू करून सर्वासाठी खुली करून दिलेली आहे. त्यामुळे संयुक्तं कृती समिती च्यावतीने पहिल्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे. कामगार मंत्री श्री. फुंडकर साहेब, नारायणरावजी राणे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब व कामगार सचिव श्री. कुंभार साहेब यांचे कामगार वर्गाकडून आभार मानण्यात येत आहेत.

rapan bottom