जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गनगरी येथे प्रशिक्षण
मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण व्यवस्थेत जर बदल करायचा असेल, तर शिक्षक, विद्यार्थी यांच्या क्षमता विकसित होणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी सदरचे प्रशिक्षण फार महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग नगरी येथे तालुकास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक प्रत्येकी 72 प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ३ ते ७ फेब्रुवारी रोजी सुरू आहे. याचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. कांबळे सर बोलत होते.
यावेळी जेष्ठ अधिव्याख्याता आर.पी. जाधव, डॉ. लवू आचरेकर, डॉ. संदीप पवार, स्नेहल पेडणेकर तसेच प्रशिक्षक म्हणून प्रा. नागेश कदम, प्रा. प्रताप सिंह यादव, प्रा.पूर्वा शिरसाट, प्रकाश कानूरकर, कर्पुर गौर जाधव, प्रीती पांचाळ, चंद्रकांत सावंत, राजू वजराठकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 राजा अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, क्षमता आधारित अध्ययन, कार्यनीती, मूल्यांकन, प्रश्न निर्मिती तसेच समग्र प्रगती पत्रक, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आदी विषयांचे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र कांबळे यांनी दिली.
यावेळी जेष्ठ अधिव्याख्याता प्रा. आर. पी. जाधव यांनी प्रशिक्षणाचे रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्नेहल पेडणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नागेश कदम यांनी केले.

