मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर चिंदर सडेवाडी या मार्गांवर उभारणी
मालवण : चिंदर सडेवाडी येथे आचरा मालवण मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर चिंदर सडेवाडी येथील स्ट्रीट लाइट कामाचा शुभारंभ देवेंद्र हडकर भाजपा शक्ती केंद्र प्रमूख तथा चेअरमन वि. का. स. संस्था चिंदर यांच्या शुभहस्ते संप्पन झाला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे, उद्योजक प्रकाश मेस्त्री, मनोज हडकर, दत्ता वराडकर, संजय लोके, गणपत चिंदरकर, प्रफुल फाटक, प्रकाश चिंदरकर, दिगंबर हडकर, निलेश हडकर, आणि पोलिस पाटील हर्षद बेनाडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. अनेक वर्ष स्ट्रीट लाइट च्या प्रतीक्षेत सडेवाडी ग्रामस्थ होते. कामाला सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

