तळगाव : तळगाव श्री रामेश्वर हायस्कुल च्या मागील बाजूस आग लागल्याने कंपाऊंडमधील अनेक झाडांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काही समाजकंटकांनी शाळेच्या आवारात मुद्दाम आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समाजकंटकांचा त्रास हा वारंवार होत आहे, कधी झाडावरील फळे, नारळ रात्रीच्या वेळी काढून नेणे, संस्थेच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करणे, अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न करणे, स्थानिक पदाधिकारी, शिक्षक यांच्याशी वाद घालणे, संघाच्या अधिकृत आणि ताब्यातील जागांवर हक्क सांगणे, संघाला त्रास देण्याचा प्रयत्न यनिमित्ताने होत आहे, असा आरोप केला जात आहे.
ही जागा शाळेची आहे, तिथे गावातल्या मुलांना शिक्षण मिळते. ती कोणाची खाजगी मालमत्ता नाही, इतकहीं भान समाजकटकांना उरलेले दिसत नाही. या काळ्याकुट्ट घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. वाईट वाटत जेव्हा आपल्याच हायस्कुलच नुकसान केले जाते. त्यामुळेच परिसरात आग कोणी लावली याची माहिती घेतली जात आहे. या वृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे, त्यामुळे आग कोणी लावली याची माहिती असल्यास, रामेश्वर हायस्कुल चे स्थानिक प्रशासन किंवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन शाळा संघ कार्यकारिणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

