Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

बांधकाम कामगारांना ऑनलाईन करण्यासाठीची मंडळाची साईट अखेर खुली!

बांधकाम कामगारांना ऑनलाईन करण्यासाठीची मंडळाची साईट अखेर खुली!

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश : हरीभाऊ चव्हाण

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणी,नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाइन करण्याची साईट खुली करण्यात यावी अशी मागणी कामगार मंत्री महोदय श्री आकाश फुंडकर यांच्या सोबत झालेल्या मंत्रालय स्तरावरील बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांनी केल्यानुसार ०४ फेब्रुवारी २०२५ रात्री पासून बांधकाम मंडळाची ऑनलाईन करण्याची साईट खुली करण्यात आली असून, मजदूर संघाच्या मागणीला यश मिळाले आहे. आता बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज बाहेरून ऑनलाईन करता येणार असल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री हरिभाऊ चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र भरातील कामगारांच्या समस्यांबाबत शासनाने धोरण निश्चित करुन कामगारांना न्याय देण्यात यावा. व बांधकाम कामगारांची ऑनलाईन साईट बंद केल्यामुळे कामगारांना होणारा त्रास व प्रलंबित प्रश्न यासाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथील आपल्या दालनात मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संघटनमंत्री सी. व्ही. राजेश, प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर, संघटनमंत्री बाळासाहेब भूजबळ, प्रदेश सचिव हरीभाऊ चव्हाण व विदर्भ प्रांत पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र भरातील कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करताना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांना बाहेरुन ऑनलाईन करण्याची पध्दत पूर्णतः बंद केल्यामुळे शासनाच्या सेवा सुविधा केंद्रात मक्तेदारी वाढली होती. नोंदणी,नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाईन करण्यासाठी कामगारांना रोजगार बुडवून दिवसभर शासनाच्या सेवा सुविधा केंद्रात तात्कळत उभे राहावे लागत होते. लाईट नसणे, नेट नसणे, साईट एरर व अननुभवी कर्मचारी यांच्यामुळे बांधकाम कामगारांना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार मंत्री महोदय आकाश फुंडकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता, बांधकाम मंडळाची बाहेरुन ऑनलाईन करण्यासाठीची साईट खुली करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदय यांनी मजदूर संघ पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार बांधकाम मंडळांतर्गत नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाइन करण्याची मंडळाची साईट ४ फेब्रुवारी २०२५ रात्री पासून सर्वांसाठी खुली करून घेण्यात भारतीय मजदूर संघाला यश मिळाले असून, आता बांधकाम कामगारांना आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज बाहेरून ऑनलाईन करता येणार आहेत. बांधकाम कामगारांनी आपले नोंदणी नूतनीकरण व लाभ अर्ज भरताना एजंटांपासून सावध राहावे व भारतीय मजदूर संघाशी संपर्क साधून बांधकाम मंडळाचे विविध लाभ मंजूर करून घ्यावेत असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे.


त्याच प्रमाणे बांधकाम कामगारांचे प्रलंबित २ लाखापेक्षा जास्त ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करुन लाभ रक्कम कामगारांच्या बॅंक खाती जमा करण्यात येतील असे आश्वासन मंत्री महोदय यांनी दिल्यानुसार प्रलंबित लाभ रक्कमही कामगारांच्या बँक खाती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम कामगारांना ठेकेदार एजन्सीं मार्फत चालू असलेल्या योजनांचा फेर आढावा घेण्यात येत असून, कामगार कुटुंबीयांच्या कल्याणासाठी त्यात सुधारणा करण्यात येत आहे.बोगस नोंदणी व ऐजंटांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कामगार मंत्री महोदय श्री आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार केलेली पूर्तता यासाठी भारतीय मजदूर संघाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे श्री हरीभाऊ चव्हाण यांनी सांगितले.

rapan bottom