Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

श्री गवळदेवचा २७ वा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ६ फेब्रुवारी पासून

श्री गवळदेवचा २७ वा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ६ फेब्रुवारी पासून

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : येथील श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनाचा  २७ वा वर्धापन दिन सोहळा  गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी आणि शुक्रवार दिनांक ७  फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.  त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. 
      श्री गवळदेव  मित्र मंडळ कुडाळ यांच्यावतीने श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनाचा  २७ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.  गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२  या वेळेत पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथी या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहेत.  दुपारी ३ ते ४ या वेळेत लहान मुलांच्या स्पर्धा आणि कार्यक्रम,  सायंकाळी ४.३० वाजता महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रम,  सायंकाळी ७  वाजता श्रींची आरती, रात्री ८ ते ९  जादूगार यशराज यांचे जादूचे प्रयोग तर रात्री नऊ वाजता खेळ पैठणीचा होणार आहे. तसेच  अयोध्या श्रीराम सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, पुष्पा २ कालीमाता देखावा आणि चिमणी पाखर डान्स अकादमी यांचा नृत्य आविष्कार हे खास कार्यक्रम होणार आहेत.
      शुक्रवार दिनांक ७  फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ८ या वेळेत नामस्मरण व श्रींची नित्य पूजा, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत लघुरुद्र, दुपारी बारा वाजता महाआरती, १२.३० ते ४.३० महाप्रसाद होईल.  सायंकाळी ५ ते ६ दरम्यान हरिपाठ (सद्गुरु श्री वामनराव पै),  सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८ ते ९.३० श्रींची पालखी मिरवणूक, रात्री ९.३० ते १०.३० श्री ब्राह्मणदेव  मित्र मंडळ कुडाळ यांचे सुश्राव्य भजन, रात्री ११ वाजता खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचा महान नाट्यप्रयोग 'लग्न आधी बाप' असे कार्यक्रम होणार आहेत.
     या श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापना सत्ताविसाव्या वर्धापन दिन सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गवळदेव मित्र मंडळ कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom