माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया
मालवण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्या वेळी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. 2025 - 26 या वर्षाच्या अर्थसंकल्पामुळे देशाचा सर्वस्पर्शी विकास व गतिमान प्रगतीला चालना मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.
कृषी क्षेत्रासाठी जाहीर योजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण होऊन अधिक लोक कृषी कडे आकृष्ट होतील. असंघटित कामगारांसाठी योजनांमुळे कामगार वर्गाला दिलासा मिळेल व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या सुधारणांमुळे रोजगार वाढीला व गुंतवणुकीला चालना मिळेल, १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळेल.
सर्वस्पर्शी विकास व गतिमान प्रगतीचा अर्थ संकल्प सादर केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.

