Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. निलेश राणे

आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. निलेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीत DMER संचालक यांनी प्रत्यक्ष पहाणी करण्याची सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या सूचनेप्रमाणे DMER संचालक श्री. अजय चंदनवाले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन पहाणी केली.

या पहाणी दरम्यान आमदार निलेश राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांकडून रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्री तसेच मनुष्यबळ पुरवठ्या संदर्भातील आढावा घेत त्यासाठी आपण वरिष्ठ स्थरावरून पाठपुरावा करणार असल्याबाबतची माहिती दिली.


यावेळी मेडिकल कॉलेज बांधकामाचा आढावा देखील कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी दिला. यावेळी दर्जेदार आणि वेगात काम करण्याची हमी सर्वगौड यांनी दिली यावर काम सुरू करता यावं यासाठी महिला हॉस्टेलसाठीच्या जागा स्थलांतरणाची माहितीही आमदार निलेश राणे यांनी घेत सिंधुदुर्ग वासीयांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू अस आवाहन आमदार निलेश राणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

यावेळी DMER संचालक डॉ. अजय चंदनवाले, मेडिकल कॉलेज डिन डॉ. अनिल डवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अजय कुमार सर्वगौड आदी उपस्थित होते.

rapan bottom