Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

केंद्र शाळा पोईप नं.1 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

केंद्र शाळा पोईप नं.1 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : पोईप सरपंच श्रीधर नाईक

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप केंद्र शाळा नं. १ येथे विद्यार्थ्यांच्या प्रारंभीच्या जडणघडणीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे योगदान महत्त्वाचे असते. अंगणवाडी नंतर जेव्हा विद्यार्थी आपल्या बालपणी प्राथमिक शाळेत जातात तेव्हा त्यांना घडविणे वय चांगले संस्कारक्षम करणे ही मोठी जबाबदारी प्राथमिक शाळा व शिक्षकांवर असते. याच काळात जर विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन व संस्कार मिळाल्यास भविष्यात हे विद्यार्थी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात त्यामुळे प्राथमिक शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहसंमेलनातून त्यांच्या सूक्त कलागुणांना वाव मिळू शकेल असे प्रतिपादन पोईप ग्रामपंचायतचे सरपंच श्रीधर नाईक यांनी केंद्र शाळा नंबर एक येथे केले. 


जि.प. केंद्र शाळा पोईप नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा सरपंच श्रीधर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पोईप गाव प्रमुख परशुराम नाईक उपसरपंच संपदा सावंत माजी उपसरपंच मनाली नाईक नांदोस ग्रामपंचायत सदस्या वैशाली घाडीगावकर शाळा समिती अध्यक्ष सोनीया चव्हाण श्रीमती आरोलकर केंद्र मुख्याध्यापक विकास घाडीगावकर व तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता पहिली ते चौथी गुणवंत विद्यार्थी तसेच ॲबॅकस एसटीएस बीडीएस मंथन एपीजे अब्दुल कलाम व विविध क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे यावेळी पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनकर कार्यक्रम सादर करून आपली कला सादर केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र मुख्याध्यापक विकास घाडीगावकर सहाय्यक शिक्षिका अश्विनी पांचाळ सिद्धी परब प्रमोद पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे योगदान व सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास घाडीगावकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.

rapan bottom