Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन

कुडाळ येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन

सिंधुदुर्ग : पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत संत राऊळ महाराज महाविद्यालय,  कुडाळ येथे  आज गुरूवारी  सकाळी ६ वाजता सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली.     या शिबिराचे उदघाटन  लायन्स क्लब कुडाळचे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर यांच्या हस्ते झाले. .त्यावेळी भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणे , सामाजिक कार्यकर्ते काका कुडाळकर,  सोशल मीडिया तहसिल प्रभारी सावंतवाडी लक्ष्मण पावसकर, पतंजलि योग समिती तहसिल प्रभारी कणकवली प्रकाश कोचरेकर,  प्रोफेसर प्रशांत केरवडेकर  आदी मान्यवर  उपस्थित होते.
     योग ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे संपूर्ण कुडाळ मधील जनतेने या योगशिबिराचा लाभ घेऊन जास्तीत जास्त  योगशिक्षक कुडाळ मध्ये व्हावेत असे  उदघाटक श्री बांदेकर यांनी सांगितले. दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर  जिल्हाप्रभारी  शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहल कडोलकर यांनी केले . सदर शिबिरास कुडाळ मधील  योगाभ्यास प्रेमींनी , तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला.      संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे व्यवस्थापक  यांनी  सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह,  स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे. आभार प्रदर्शन अनिल मेस्त्री यांनी केले.

rapan bottom