Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वराड सोनवडेपार पुलाच्या कामाशी नारायण राणे आणि निलेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही- हरी खोबरेकर

वराड सोनवडेपार पुलाच्या कामाशी नारायण राणे आणि निलेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही- हरी खोबरेकर

मा. खासदार विनायक राऊत यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राणे कुटुंबाची धडपड

मालवण : कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे कर्ली खाडीवर बांधण्यात आलेले पूल हे २०१८ साली  विनायक राऊत यांनी खासदार असताना मंजूर करून घेतले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत १० कोटी ५९ लाख रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले होते. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मा. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व मा. आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पुलाच्या कामाची वर्कऑर्डर देखील  ०५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाली आहे.मात्र  सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते. त्यासाठी देखील विनायक राऊत व  वैभव नाईक  यांनी पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर करून काम सुरु करून घेतले होते. २४ एप्रिल २०२३ रोजी  विनायक राऊत व  वैभव नाईक यांनी वराड पुलाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करून काम पूर्ण करण्यास होणार विलंब आणि येणाऱ्या अडचणीबाबत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला होता. विनायक राऊत व  वैभव नाईक यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून वराड सोनवडेपार पुलाचे काम आता पूर्ण झाले असून पुलाचे लोकार्पण करून  पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राणे कुटूंबियांची धडपड सुरु आहे.

मात्र या  कामाशी नारायण राणे आणि निलेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही. असेल तर त्याचे कागदोपत्री पुरावे त्यांनी द्यावेत. विनायक राऊत गेली ६ वर्षे या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सीआरझेड  आणि पर्यावरण संबंधीच्या परवानग्या त्यांनी दिल्ली व मुंबईवरून मिळविल्या आहेत. त्याचबरोबर विनायक राऊत यांनी २० पेक्षा जास्त वेळा वराड पुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून कामावर लक्ष ठेवले होते. मात्र आता श्रेय घेणारे नारायण राणे त्या पुलावर किती वेळा गेले? त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या कामाचे  लोकार्पण राणे कुटुंबीयांनी करण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर प्रलंबित कामे त्यांनी मंजूर करून ती पूर्ण करून दाखवावीत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

rapan bottom