Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

संत राऊळ महाराज महाविद्यालयात १ फेब्रुवारीला राष्ट्रीय चर्चासत्र

संत राऊळ महाराज महाविद्यालयात १ फेब्रुवारीला राष्ट्रीय चर्चासत्र

सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय शास्त्र यांमधील नवे प्रवाह

देशभरातून तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती

निलेश जोशी | कुडाळ :संत राऊळ महाराज महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, ग्रंथालय विभाग आणि ICSSR (WRC), Mumbai. यांच्या संयुक्तविद्यमाने ''सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय शास्त्र यांमधील नवे प्रवाह" या विषयावर १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य, तसेच ग्रंथालय क्षेत्रातील नवे प्रवाह आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळणार आहे.अशी माहिती डॉ. बी. ए. तुपेरे यांनी दिली.


या चर्चासत्रातून वरील तीनही विषयावरील नवे प्रवाह तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेट आणि सोशल मीडिया यांचा प्रभाव आणि त्यातून होणारे बदल याविषयीची सखोल माहिती विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत. त्याचबरोबर देशभरातील विविध विषयांमधील संशोधक या माहितीमध्ये भर टाकणार आहेत. तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांना आधुनिक युगात विविध विषयातील नवीन माहिती या चर्चासत्रातून मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना या चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.


या चर्चासत्रासाठी देशभरातून विविविध मान्यवर तज्ञानी ८० पेक्षा जास्त संशोधक पेपर पाठविले आहेत. अनेक मान्यवर तज्ञ या चर्चासत्राला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये सोमय्या विद्यापीठातील ग्रंथपाल डॉ. वयजंडे, बांदा महाविद्यालयाचे डॉ. डी. जे. जोशी, लांजा कॉलेजचे प्रा. डॉ. के. आर. चव्हाण असे अनेक मान्यवर या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार असल्याचे डॉ. तुपेरे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. योगेश कोळी, प्रा. जमदाडे, प्रा. जांभळे, प्रा. शरयू असोलकर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. रवींद्र गावडे आदी उपस्थित होते.

rapan bottom