सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात सकारात्मक चर्चा
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, प्रस्तावित आंजीवडे घाटमार्गाचा डीपीआर बनविण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात देखिल चर्चा झाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया 'एक्स'वरून दिली आहे.
आमदार निलेश राणे म्हणाले, कुडाळ मालवणचा बॅकलॉक मोठा आहे. बांधकाम मंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
एकूणच आमदार निलेश राणे सातत्याने कुडाळ मालवणच्या गतिमान विकासासाठी आग्रही असून अनेक विकास प्रकल्प गती पकडत आहेत. आमदार निलेश राणे यांच्या आमदारकीच्या पहिल्या दोन महिन्यातच मालवण कुडाळ प्रगतीपथावर दिसून येत आहे. अश्या भावना नागरिक व्यक्त करतं आहेत.
फोटो : आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. (अमित खोत, मालवण)

आमदार निलेश राणे यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट
