Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच

कर्नाटकातील हायस्पीड मासेमारी नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने घेतली ताब्यात

वेंगुर्ला : मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी मंत्री पदाचा पदाभार घेतल्यानंतर मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरुच आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई करत कर्नाटक येथील हायस्पीड नौका ताब्यात घेतली आहे.

आरवली वेंगुर्ला समोर 16 वाव पाण्यात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी वेंगुर्ला) २८ जानेवारी रोजी नियमित गस्त घालत होते, त्यावेळी रात्री ११:३० चा सुमारास कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली जलशिला सुवर्णा कोटियान रा. कोदावूर ता. मलपे, राज्य कर्नाटक यांची नौका हनुमा सानिध्य नों. क्र.- IND - KA- २-MM-५२१७ द्वारे महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात आरवली वेंगुर्ला समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडले, या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. सदर नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

अंमलबजावणी अधिकारी श्री मुरारी भालेकर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी वेंगुर्ला) यांनी पोलीस कर्मचारी श्री आळवेकर तसेच दीपेश मायबा, मिमोह जाधव व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागर परब व राजेश कुबल, स्वप्निल सावजी, निलेश पाणजी, प्रणित मुणगेकर, हर्षद टाक्कर, भगवान तांडेल, चंद्रकांत कुबल, सागरी सुरक्षा रक्षक यांच्यासह कार्याने सदर कारवाई करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे

rapan bottom