Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आ. निलेश राणे खऱ्या अर्थाने देवदूत

आ. निलेश राणे खऱ्या अर्थाने देवदूत

किर कुटुंबियांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : राणे कुटुंबाला देवदूत म्हणून का ओळखतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. गणेश किर या युवकाचा ३ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉस्पिटल मध्ये त्याला तातडीने दाखल करण्यात आले. त्याच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रियाही करण्यात आली. परंतु संबंधित हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारत तब्बल २४ लाखांवर नेऊन ठेवले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना १५ लाखांचा अतिरिक्त भुर्दंड बसत होता. पेशंटच्या नातेवाईकांनी ही बाब आ. निलेश राणेंच्या कानावर घातली. आ. निलेश राणे यांच्या दणक्यानंतर हॉस्पिटल प्रशासन वठणीवर येत अतिरिक्त शुल्क वजा करून रुग्णाला डिस्चार्ज दिला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे तब्बल १५ लाखांचे होणारे नुकसान टळले. 

याबाबत अधिक माहिती अशी, गणेश किर नामक युवकाचा ३ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रियेसाठी लागणारे सुरवातीचे ६ लाख 90 हजार इकडून तिकडून जमा केले. परंतु शेवटचे ३ लाख भरायला विलंब होत असल्याने रुग्णाला हॉस्पिटल डिस्चार्ज देत नव्हते. तब्बल दीड महिने या रुग्णाला हॉस्पिटल मधून बाहेर पडण्यासाठी वाट पाहावी लागली. बघता बघता हॉस्पिटलचे बिल २४ लाखांवर येऊन पोहोचले. या रुग्णाची आई मदतीसाठी सर्वांना हाक देत होती. परंतु कोणीही मदत करत नसल्याने साश्रू नयनांनी दररोज सायंकाळी घरी जात होती. मुंबईतील राजकीय पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या कानावर घालून देखील या माऊलीला न्याय मिळत नव्हता.

यां माऊलीने आमदार निलेश राणे यांच्या याबाबत माहिती दिली. आमदार राणे यांनी लगेचच आपल्या राणे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कॉल करून हॉस्पिटलला भेट देण्यास सांगितले. तसेच जोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत माझे पदाधिकारी तुमच्या केबिनच्या बाहेर ठाण मांडून बसतील अशी सक्त ताकीद हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली. हॉस्पिटल प्रशासनाला राणे स्टाईल दणका दिल्यानंतर प्रशासन वठणीवर आले. त्यांनी संबंधित रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज दिला. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने गणेश कीर तब्बल तीन महिन्यांनी आपल्या घरी परतले. तसेच त्यांचे होणारे तब्बल १५ लाखांचे नुकसान टळले. राणे कुटुंबाला देवदूत म्हणून का ओळखले जाते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

फोटो : आमदार निलेश राणे

rapan bottom