Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चित्ररथ स्पर्धेच्या माध्यमातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

चित्ररथ स्पर्धेच्या माध्यमातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

कट्टा येथील चित्ररथ स्पर्धेत जिप प्राथमिक शाळा पेंडूर नं. १ आणि वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाने पटकाविला प्रथम क्रमांक

मालवण : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्ररथ स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर नंबर १ तर इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाने प्रथम क्रमांक पटकाविला

या स्पर्धेत भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन , स्वच्छता ,प्लास्टिक प्रदूषण, विविधतेतून एकता, भारतीय संविधान, ऐतिहासिक प्रसंग अशा विविध विषयांवर अतिशय कल्पकतेने सर्व सहभागी शाळांनी चित्ररथाच्या माध्यमातून विविध देखावे सादर केले. यात विद्यार्थी, शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टा नंबर 1, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोस सारंगवाडा , उत्तेजनार्थ पारितोषिक वराडकर हायस्कूल कट्टा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोस,गावकरवाडा व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा यांनी पटकावला तर इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवडे, तृतीय क्रमांक वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांनी मिळविला.

यावेळी पंचक्रोशी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्थेचे उपाध्यक्ष , तथा वरची गुरामवाड कट्टा चे सरपंच श्री शेखर पेणकर, सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीम. विजयश्री देसाई ,सहसचिव श्री एस. डी. गावडे शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर ,संचालिका सौ.स्वाती वराडकर संचालक श्री महेश वाईरकर, वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे ,वराडकर इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक श्री. ऋषिकेश नाईक डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी उपस्थित होते.

या स्पर्धचे परीक्षक म्हणून श्री.राजेश आजगावकर व श्री अनिल आचरेकर यांनी केली यावेळी आभार कला शिक्षक समीर चांदरकर यांनी मानले.

rapan bottom