मालवण : मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला.
यावेळी विविध शाळाचे नृत्याविष्कार सादर झाले. यामध्ये टोपीवाला हायस्कुल मधील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य, कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित नृत्य कलाकृती, भंडारी ए. सो. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साडी ड्रिल हा नृत्याविष्कार तर टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाभारतावर आधारित नृत्य कलाकृती सादर केली. तसेच मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय सण उत्सव यावर आधारित नृत्य तर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कवायती सादर केल्या. या सर्व कार्यक्रमाना उपस्थितानी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच मालवण मधील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

