Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा

पत्रकार परिषदेत वीज संघर्ष समितीचा एल्गार

महाविकास आघाडीचाही पाठिंबा

निलेश जोशी | कुडाळ : अदानी आला घराला, स्मार्ट वीज मीटर आपल्या दाराला... कात्री आपल्या खिश्याला असा नारा देत स्मार्ट आणि प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समिती आणि वीज ग्राहकांच्या  वतीने येत्या १० फेब्रुवारीला कुडाळ येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांनी दिली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे इर्शाद शेख, अमित सामंत, संजय पडते आदी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगितले. दरम्यान त्या आशयाचे निवेदन त्यांनी आज अधीक्षक अभियंता कार्यालयात दिले. हा मोर्चा सरकार विरोधात नसून सरकारच्या धोरणाविरुद्ध असल्याचे सांगण्यात आले.
    यावेळी बोलताना संपत देसाई म्हणाले, महावितरण कंपनीचे खाजगीकरण रोखण्यासाठी आणि अदानीच्या घश्यात जाणारी MSEB वाचवण्यासाठी महावितरण स्मार्ट मीटर बसल्यास अधिक गतीने पळणारआहे, विजेचे दर वाढणार आहेत, तुमची आमची लुटमार होणार हे रोखण्यासाठी हा मोर्चा आहे.  घरातील जुने मीटर व्यवस्थित असतानाही  ते काढून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला दिला आहे. . मुंबई सह प. महाराष्ट्र अदानीच्या ताब्यात जाणार हे ताबडतोबीने थांबवण्यासाठी हा मोर्चा आहे. तसेच  ताल्कालीन उर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सामान्य माणसाला दिलासा म्हणून 03 जुलै 2024 रोजी कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. तरीही अदानी समूहाने जबरदस्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी नोकर भरती करून, ग्राहकाना न सांगता मीटर बसवणे चालू केले आहे. तसेच नवीन वीज जोडणीसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीचे करण्यात येत आहे. हे थांबवण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संपत देसाई यांनी सांगितले.
    या मोर्चाला महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपली भूमिका जाहीर करून मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
     यावेळी अतुल बंगे, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, दीपक जाधव, अंकुश कदम, प्रकाश मोरुस्कर, मारुती पाटील, सहदेव पावसकर, मंगेश बांदेकर, अरुण परुळेकर, दिलीप परुळेकर, महादेव पावसकर, मयुरेश देसाई, राहुल कदम, संजय पारसेकर,  मंगेश तळवणेकर, संतोष तर्फे आदी उपस्थित होते.

rapan bottom